---Advertisement---
एरंडोल

एरंडोलमध्ये म्युकरोमायकोसिस व कोविडच्या आजारांचे रोगनिदान व मार्गदर्शन शिबिर

jalgaon (2)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन आणि सुखकर्ता फाउंडेशन, एरंडोल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर येत्या रविवारी दिनांक २३ मे २०२१ रोजी एरंडोल येथील जाखेटे भवन, पांडववाडा येथे दुपारी ४ ते ६:३० ह्या वेळेत आयोजित केलेले आहे.

jalgaon (2)

सद्यस्थितीत  कोरोनासंसर्गातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे . म्युकरमायकोसिस ह्या बुरशीजन्य व जीवघेण्या अश्या आजाराचा हि ह्यात समावेश आहे . जळगाव जिल्ह्यातही अश्या रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असल्यामुळे ह्या आजाराबाबत जागरूकता असणेकामी व लवकर निदान होणेसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

---Advertisement---

ह्या रोगनिदान व मार्गदर्शन शिबिरात जळगाव येथील नेत्ररोगतज्ञ् डॉ. धर्मेंद्र पाटील,डॉ. राहुल मयूर (पॅथॉलॉजिस्ट), डॉ.नरेंद्र ठाकूर ( भूलवैद्यकतज्ञ्), एरंडोल येथील दंतरोगतज्ञ् डॉ. मकरंद पिंगळे, डॉ. इब्राहिम बोहरी हे म्युकरोमायकोसिस संदर्भात व एरंडोल येथील फिजिशियन डॉ. फरहाज बोहरी, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. सुयश पाटील हे पोस्ट कोव्हीड लक्षणे अन आजार ह्याबाबत मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी, त्यांच्या जवळील नातेवाईकांनी, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींनी ह्या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा त्याचबरोबर अश्या संशयित रुग्णांना ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, सचिव डॉ. राहुल वाघ, सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. गीतांजली ठाकूर ह्यांनी केले आहे.

ह्या शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधनात्मक त्रिसूत्री चा वापर केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन व उपचाराची जुनी कागदपत्रे घेऊनच नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---