⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; येथे करा अर्ज

सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; येथे करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२४ । महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृतो वृध्दीगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, पंच्यात्तर हजार रुपये, पन्नास हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, व ग्रंथ भेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये पन्नास हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रथालय सेवक यांना प्रत्येकी पंचविस हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात येते.

2023-24 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 26 ऑगस्ट, 2024 ते 25 सप्टेंबर, 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन प्र. ग्रथालय संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.