शेतकऱ्यांनो..! खरीप हंगामाच्या पिकांसाठी पाणी हवंय? करा अर्ज, ‘या’ आहेत अटी?

जून 1, 2023 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । वाघुर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत /अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार खरीप हंगाम मध्ये 30 मे, 2023 ते 30 जून 2023 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही इतर बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन खालील अटीस अनुसरून पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.

dam jpg webp

तरी खालील अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. खरीप हंगाम सन 2023-24 अखेर संपुर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील. पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये. पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल. मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल.

पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार मंजुरी देण्यात येईल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दिनांक 29 मार्च, 2022 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now