जळगाव जिल्हा

मंत्रिमंडळ विस्तार : आ.किशोर पाटलांना मिळणार राज्य मंत्रिपद!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्त्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आणि पायउतार व्हावं लागलं. त्यांनतर शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले असून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळात अद्यापही विस्तार झालेला नाही. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील यांची शिंदे सरकार मध्ये राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी कार्यकर्त्यांकडून देखील प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

शिंदे गटातील शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे शिंदे आणि भाजपा सरकार मध्ये ते कॅबिनेट मंत्री पदाकारिता दावेदार आहेत. जळगाव जिल्ह्याला शिंदे गटातून दोन कॅबिनेट मिळणं कठीण आहे. मात्र आ. किशोर पाटील यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आ. किशोर पाटील यांची ‘कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागावी, आ. किशोर पाटीलांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा मार्ग खडतर असला तरी राज्यमंत्री वर्णी निश्चित मानली जात असल्याचे देखील समजतेय. तसेच यासाठी कार्यकर्त्यांकडून देखील प्रयत्न सुरु आहेत.

आ. किशोर पाटील पाचोरा व भडगाव या विधानसभा मतदार संघांचं दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून मतदारसंघात विकास निधी खेचुन आणत पाचोरासह भडगाव तालुक्यातील सर्वाधिक विकासाचा पॅटर्न आमदार किशोर पाटील यांच्या मागणीने झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून किशोर पाटील यांना समजले जाते. आ. किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास पाचोरा, भडगाव मतदार संघात विकासाचा नवा आलेख ते उभारू शकता, विविध विकास कामे मार्गी लावून आपला मतदार संघ सुजलाम सुफलाम करू शकता असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

Related Articles

Back to top button