कै. नानासाहेब रावसाहेब पंडित पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कमवले घवघवीत यश
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । कै. नानासाहेब रावसाहेब पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या विद्यालयाचा निकाल 95 टक्के लागला.
अचल सोनवणे येणे विज्ञान शाखेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला 88 टक्के मिळाले. तर लोकेश ज्ञानेश्वर पगारे याला 87 टक्के मिळाले. गायत्री अरुण लोंढे हिला ८६ टक्के मिळाले. याबरोबर वाणिज्य शाखेत ऋतुजा बाप्पू आघाव हिने 80% पटकन प्रथम स्थान पटकावला. कला शाखेमध्ये सुनंदा बोरसे हिला 74 टक्के मिळाले. या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील 288 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता विज्ञान शाखेचे शंभर टक्के निकाल लागला असून वाणिज्य शाखेचा 99 टक्के कला शाखेचा 85 टक्के निकाल लागला. उत्तीर्ण झालेले असेल विद्यार्थ्यांना सचिव महेंद्र गांगुर्डे व कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य व विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत.