⁠ 

रडीचा डाव खेळणं संजय राऊतांचा कायमचा धंदा ; मंत्री गुलाबराव पाटीलांचा टोला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुका झाल्यांनतर आता एक्झिट पोल समोर आले असून यात एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर जोरदार टीका केली असून यावरून आता राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राउतांवर तोफ डागली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, रडीचा डाव खेळणं हा तर संजय राऊतांचा कायमचा धंदा आहे. एक्झिट पोलवर बोलायचं, ईव्हीएम बोलायचं, येत्या 4 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणार, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जळगावच्या दोन्ही जागा आमच्याच निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एक्झिट पोलमधून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले असले तरी राज्यात मात्र महायुतीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातच राज्यात महायुतीला 22 ते 26 जागा तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील (Gulbarao Patil) यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

काय म्हणाले मंत्री पाटील?
आदरणीय मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. जे एक्झिट पोल आपल्याला दिसत आहेत ते 400 च्या आसपास निकाल जातील अशा स्वरूपाचे दिसत आहेत. काही ठिकाणी अतितटीची लढत आहे. जरी शिंदे गटाच्या सात जागा दाखवत असल्या तरी मला विश्वास आहे की नऊ जागा आमच्या निवडून येतील. महाराष्ट्रात आपण जर पाहिले तर आम्हाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. आम्हाला गॅरंटी होती ती 40 ते 45 जागा आमच्या येतील. मात्र 35 जागांपर्यंत आम्ही जाऊ याची मला खात्री आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात चार जागा येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

जळगावच्या दोन्ही जागा आमच्याच निवडून येणार
एक्झिट पोलमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या आघाडीवर आहेत. याबाबत गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या दोन्ही जागा या, आमच्याच निवडून येतील हे मी पूर्वीपासूनच सांगत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.