Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Eknath Shinde Updates : जळगावकर खासदाराकडे एकनाथ शिंदे गटाच्या पाहुणचाराची जबादारी

eknath-shinde-c-r-patil
गौरी बारीbyगौरी बारी
June 21, 2022 | 10:18 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास २५ आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. राज्यात सरकार कोसळणार का? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच शिंदे यांचा गट सुरतमधील हॉटेल ला मेरिडियनमध्ये थांबले आहेत. हॉटेलबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असून एकनाथ शिंदे यांच्या पाहुणचाराची जबाबदारी जळगावकर असलेले भाजप खा.सी.आर.पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खा.सी.आर. पाटील हे भाजपचे प्रभावी नेते असून त्यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे देखील वृत्त आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी आमदारांसह गुजरातमध्ये दाखल झाले असून ते सूरत येथील हॉटेल ला मेरिडियनमध्ये थांबले आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असणारे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांच्याकडे शिंदे यांच्या गटाचा पाहुणचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे वृत्त आहे. सी.आर.पाटील यांनी भेट घेतल्याचे देखील समोर आले आहे.

विधान परिषदेतील विजय आणि पराभवाचे वातावरण निवळत नाही तोच महाविकास आघाडी सरकारची झोप उडविणारी बातमी समोर आली. शिवसेनेचे प्रभावी मंत्री आणि प्रति मुख्यमंत्री समजले जाणारे ना.एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह अहमदाबादमध्ये दाखल झाले असून ते नॉट रिचेबल असल्याचे समोर आले होते. रात्रीच एक मोठा गट अहमदाबादहून आपल्या सहकार्‍यांसह सूरत येथील ला मेरेडीयन या हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा : Eknath Shinde Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुलाबराव पाटील यांच्यात बैठक सुरु

सुरत येथील हॉटेल ला मेरिडियन बाहेर अतिशय कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हॉटेलचे व्यवस्थापक देखील यावर लक्ष ठेवून आहेत. स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री या स्थितीवर नजर ठेवून आहेत. सूरत, नवसारी आदी भागात खान्देशमधील लोक मोठ्या संख्येने आहेत. यात नवसारी येथील खासदार हे सी. आर. पाटील हे असून ते मूळचे भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in राजकारण, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र
Tags: C R PatilEknath ShindeShivSenaएकनाथ शिंदेशिवसेना
SendShareTweet
गौरी बारी

गौरी बारी

पत्रकारिता क्षेत्रात गत २ वर्षांपासून कार्यरत. लाईव्ह, स्टुडिओमध्ये विविध कार्यक्रमांची अँकरिंग. मुलाखतींचा विशेष अनुभव. ऐतिहासिक, नावीन्यपूर्ण विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न. व्हाईस ओव्हर, व्हिडीओ एडिटिंगचा अनुभव. विशेष वृत्त तसेच वृत्त संपादनचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
crime 2022 06 21T102244.144

धक्कादायक : पत्नीची वाद झाल्याने पतीने केला मुलीला विहिरीत फेकून आत्महत्येचा प्रयत्न

gold silver 5

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, घ्या जाणून आजचा भाव

mahavikas aghadi 1

महाविकास आघाडीवर आणखी एक संकट! काँग्रेसचा 'हा' मोठा नेता देणार राजीनामा?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group