जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२। जळगावात कापड व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. सुरेशकुमार मिठूमल मताना (वय ५०, रा. सिंधी कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या कापड व्यावसायिकाचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सिंधी कॉलनी राहणारे सुरेशकुमार मताना यांचे फुले मार्केट परिसरात कपडे विकून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबियासोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही.

नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी कमला, मुलगा दीपक, सुन हीर, नात यशीका असा परिवार आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.
हे देखील वाचा :
- स्व. अजितदादा पवारांच्या प्रथम जयंतीनिमित्त यावल तहसील कार्यालयात प्रतिमा भेट
- पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- मुख्यमंत्री फडणवीसांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
- ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग दणक्यात! शिरसोलीत ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद











