सहा ठिकाणी घरफोडी ; किनगावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मे 21, 2021 6:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । यावल तालुक्यातील येथील किनगावात आत्माराम नगरात सहा ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

crime

याबाबत असे की. २१ मे मध्यरात्री दरम्यान २ वाजेच्या सुमारास आत्माराम नगरातील सहा घराच्या मागील बाजूस असलेल्या घरात सर्व घरातील मंडळी आपआपल्या घरात झोपून असतांनाच चोरट्यांनी घराच्या मागील खिडकी तोडून घरात प्रवेश केला. मात्र घरातून काय चोरी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

घटनेची व्रुत्त कळताच यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. दरम्यान एकाच गावात एकाच ठिकाणी ५ ते  ६ घरफोड्या करण्याची ही पहिलीच घटना घडली घटनेच्या मागे परप्रांतीय सराईत गुन्हेगारांची टोळी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे किनगावात व परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now