गुन्हेजळगाव शहर

कॉईल व सर्व्हिस वायरचे बंडल चोरी करणारा चोरटा जेरबंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । एमआयडीसी परिसरातील कंपनीतून कॉईल व सर्व्हिस वायरचे बंडल चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर पोलिसांनी त्या चोरट्याला जेरबंद केले आहे. दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण, रा.सुप्रिम कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर गुन्हा त्याने त्याचा साथीदार संतोष मोहन चव्हाण रा. पांडे किराणा समोर सुप्रिम कॉलनी याच्या मदतीने केल्याचे कबुल केले आहे.

कंपनी मालक राहुल प्रताप गुरनानी यांनी फिर्याद दाखल केली होती. 19 जुलै रोजी गिता इंडस्ट्रीज या कंपनीच्या शटरला असलेले कुलपु तोडुन आरोपींनी आत प्रवेश करुन चोरीचा प्रकार केला होता. रेकॉर्ड वरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण याने हा गुन्हा केल्याची माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली होती. त्या माहितीच्य आधारे स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळकसर, सुधीर सावळे, इम्रान अली सैय्यद, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे आदींच्या पथकाने संतोष मोहन चव्हाण यास अटक केली आहे.

दरम्यान, त्याच्या ताब्यातून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. न्या. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 30 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Related Articles

Back to top button