⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरात कोरोनाचे नियम पाळत बौद्ध पौर्णिमा साजरी

अमळनेरात कोरोनाचे नियम पाळत बौद्ध पौर्णिमा साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । अमळनेर शहरात बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व कोरोनाचे सर्व नियम पाळत साजरी झाली. इतर वेळेस बौद्ध पौर्णिमेनिमित्त मोठं मोठे कार्यक्रम प्रत्येक भागात होत असत. मात्र गेल्या वर्षापासून बौद्ध पौर्णिमेसह विविध सणांवर कोरोनाचे सावट आहे. अमळनेर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी प्रत्येक सण उत्सव कोरोना बाबत दक्षता घेऊनच साजरे करत आहेत.

शहरातील फरशी रोड भागात नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या प्रतिनिधित्वाने संध्याकाळी बौद्ध पूजा व 100 लिटर दुधाची खीर वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते.

तसेच पैलाढ भागात असलेल्या बौद्ध विहार येथे गजरे परिवार व परिसरातील नागरिकांनी बौद्ध पूजा व खीर वाटप आयोजित केले होते. यावेळी रवींद्र गजरे व त्यांच्या पत्नी इंदूबाई गजरे यांच्या हस्ते सर्व विधी झाली. नंतर या दाम्पत्याच्या हस्ते खीर वाटपही करण्यात आली. यावेळी आयोजकांनी कोरोना बाबत त्रिसूत्रीचे पालन करत कार्यक्रम घडवून आणला.

ताडेपुरा भागातील साई – गजानन नगर मध्येही मोठ्या उत्साहात तरुणांनी कार्यक्रम आयोजित केला होता. येथेही बौद्ध पूजा व खीर वाटप करण्यात आले. फरशी रोड व पैलाढ भागात भन्ते सिद्धार्थ सोनवणे तसेच ताडेपुरा भागात कैलास बिऱ्हाडे यांनी विधी केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.