पैशाचा वाद विकोपाला ; मुक्ताईनगरात डोक्यात दगड घालून भावाची हत्या

ऑगस्ट 17, 2023 12:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यातच मुक्ताईनगरात एक धक्कादायक घटना समोर आलाय. घरात पैसे देणे घेण्याच्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली. मुखा मानकू शिंदे (वय-४५) रा. पुर्णाड वस्ती ता. मुक्ताईनगर असे मयत व्यक्तीचे नाव असून याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

murder raver

नेमकी काय आहे घटना?
मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड वस्ती येथे कुटुंबियांसह वास्तव्यास असलेले मुखा मानकू शिंदे यांचा १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ पंढरी मानकू शिंदे यांच्यात पैशांवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या रागातून पंढरी याने भाऊ मुखा शिंदे यांच्या डोक्यात दगड टाकला. त्यात ते गंभीर जखमी झाला.

त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तयत मुखा शिंदे याचा मुलगा दगडू मुखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी मानकू शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पंढरी मानकू शिंदे याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now