⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | ही संधी चुकवू नका ! सीमा रस्ते संघटनेत 876 पदांची भरती, 12वी पाससाठी संधी..

ही संधी चुकवू नका ! सीमा रस्ते संघटनेत 876 पदांची भरती, 12वी पाससाठी संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BRO GREF Recruitment 2022 : 10वी, 12वी पाससाठी उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स आहे. सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation) येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022असणार आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :

१) स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical)
पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

२) मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker)
पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Passed Class 2 course for Driver Plant and Mechanical Transport पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) – 18 ते 27 वर्ष

मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) – 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2022

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.