गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

मे 21, 2026 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचा बी.एस्सी. नर्सिंग प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

gd 1

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली.या परीक्षेत पायल चंद्रिकापूरे हिने ७६.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गौरी प्रवीण धावले व संस्कृती राहुल पुनवतकर यांनी ७४.८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. अक्षदा अरविंद गावित, मयुरी दिनकर कोळी आणि शर्ली स्टिव्हेन्सन यांनी ७२.८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच ऋषिकेश राजेश्वर गुंड यांनी ७१.२ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक, तर तृप्ती पुरुषोत्तम करंगळे हिने ७०.८ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील,सदस्या डॉ. केतकी पाटील,हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, प्राचार्य विशाखा गणविर आणि प्राध्यापकवर्ग व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रशिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची यशस्वी परंपरा कायम राहिली आहे. या उल्लेखनीय निकालामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories