बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदांची भरती; 10वी उत्तीर्णांना संधी, पगार 56,900

फेब्रुवारी 10, 2026 6:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी असून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) कामगार पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Brihanmumbai Mahanagarpalika Bharti

bmc jpg webp

या भरतीअंतर्गत पदाचे नाव – कामगार असे असून, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई येथे करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Advertisements

वयोमर्यादेबाबत, 22 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार ५ वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

Advertisements

अर्ज शुल्काबाबत, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹1000/-, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹900/- इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.

किती पगार मिळेल : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000/- ते 56,900/- पर्यंत वेतन मिळेल

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारांनी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे. अंतिम तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ही भरती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक चांगली संधी मानली जात आहे.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now