Breaking : सराफ बाजारात दुकान फोडले, पोलीस दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील चोरीचे सत्र थांबतच नसून आज पुन्हा एक चोरी समोर आली आहे. चोरट्यांनी सराफ बाजारातील एका दुकानाला लक्ष केले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.

सराफ बाजारातील मागील गल्लीला जोडणाऱ्या बोळीत गणपती नगरात राहणारे ललित वर्मा यांचे मनीष ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फायदा घेत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडत डल्ला मारला.

मंगळवारी सकाळी दुकानाचे शटर उघडे दिसल्यावर घडलेला प्रकार लक्षात आला. मनीष ज्वेलर्स दागिने तयार करण्याचे आणि पॉलिश करण्याचे दुकान आहे. घटनास्थळी शनिपेठ पोलिसांचा ताफा पोहचला असून तपास सुरू आहे. दरम्यान, किती मुद्देमाल चोरी झाला हे अद्याप कळू शकले नाही. काही वर्षापूर्वी देखील चोरट्यांनी मनीष ज्वेलर्सच्या जवळील दुकानांना लक्ष केले होते.