ब्रेकिंग : जळगावात दोन गटात वाद, रस्त्यावर २ राउंड फायर केल्याची चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील स्टेट बँक चौकात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही तरुणांनी भर रस्त्यावर २ राउंड फायर केले असल्याची अफवा पसरली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहचले असून चौकशी करीत आहे. अद्याप तरी काडतूसचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही.

जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांचे क्रिकेट सामने शिवतीर्थ मैदानावर रंगले होते. रविवारी अंतीम लढत होती. अंतीम लढत संपल्यावर तरुणांचा मोठा जमाव बाहेर पडला. रविवार असल्याने नागरिकांची देखील गर्दी होती. नेमके याच वेळी तरुणांच्या दोन गटात वाद झाला. स्टेट बँक चौकाजवळ तरुण काही तरुण पळत आले. तिघांनी जीव वाचावीत पळ काढला.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि कर्मचारी पोहचले आहेत. घटनास्थळी एक ट्यूब लाईट फोडलेली आढळून आली आहे. परिसरात दोन वेळा काहीतरी मोठा आवाज झाल्याची माहिती काही दुकानदारांनी दिली आहे. घटनास्थळी काडतूसचे कोणतेही झाकण आढळून आले नसून तूर्तास तरी २ राउंड फायर केल्याची निव्वळ अफवा असल्याचे समजते.