दुर्दैवी! मामाच्या गावी आलेल्या मुलाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

मे 31, 2024 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । गिरणा नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पिलखोड (ता. चाळीसगाव) परिसरात घडली. ओम विजय चव्हाण (वय १८) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

Om chavan jpg webp

मालेगाव तालुक्यातील हिसवाळ येथील ओम विजय चव्हाण हा चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे मामाच्या गावी आला होता. दरम्यान गिरणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीत पोहण्याचा मोह आल्याने ओम हा त्याच्या नातेवाईकांसह तिघेजण पोहण्यासाठी उपखेडच्या गिरणा पात्रात गेले. पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण पोहताना वाहून जात असताना कसे तरी बचावले. मात्र ओम हा पाण्यात वाहुन गेला.

सदर घटनेची माहिती गावात समजताच गिरणा नदीत शोध घेण्यासाठी ग्रामस्थ आले. मात्र ओम पाण्याच्या वेगवान प्रवाहात गेल्याने त्याचा शोध लागत नव्हता. गावकर्‍यांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना दिल्यानंतर पोलीसही दाखल झाले. मात्र ओमचा मृतदेह दुसऱ्या दिवशी २४ तासानंतर वरखेडे धरणाच्या गेटजवळ पाण्यात आढळून आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now