नोकरी संधी

7वी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी ; तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई उच्च न्यायालयामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष सातवी पास असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. Bombay High Court Bharti 2025

मुंबई उच्च न्यायालयाने सफाई कामगार या पदासाठी भरती जाहीर केलीय. या नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 ही आहेत. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावा.Bombay High Court Recruitment

शैक्षणिक पात्रता:
सफाई कामगार
– (i) किमान सातवी उत्तीर्ण (ii) संबंधित अनुभव
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : ₹300/-
किती पगार मिळेल : या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,600/- ते 52,400/- पर्यंत पगार मिळेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button