जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । जळगाव शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या समोर आज शनिवारी सकाळी एका वयोवृध्द महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या महिलेचे ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
याबाबत असे की, शहरातील नविन बी.जे. मार्केट परिसरातील इंडीयन रेडक्रॉस सोसायटीसमोर एका ६० ते ६५ वर्षीय वयोवृध्द महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबतची माहिती इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील आणि पो.ना. संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.
मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी मयत वृध्द महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.