विद्यार्थिनी झाल्या रणरागिणी ! छेड काढणाऱ्या तरुणाला धु-धु धुतलं

मार्च 15, 2022 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । राज्यात मुलींसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी ते काही केल्या कमी होत नाहीय. अशातच शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. छेड काढणाऱ्या तरुणीला अद्दल घडविण्यासाठी विद्यार्थिनींनी रणरागिणींचं रुप घेतल्याचं पाहायला मिळालं.

yavati news jpg webp

नेहमी छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोला शाळेतील विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. बोदवड तालुक्यात येवती गावाजवळ हा प्रकार घडला. मुलींचा रुद्रावतार पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनीही तरुणाला फटके देत त्याला पोलिसांकडे सोपवलं.

एसटी बस बंद असल्याने येवती गावातील शाळकरी मुली बोदवड शहरात शाळेत पायी चालत जातात. याच दरम्यान एक तरुण काही मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत त्यांची छेड काढत असे. आजही असाच प्रकार या तरुणाने केल्यावर संतप्त झालेल्या या मुलींनी आपला रुद्रावतार दाखवत त्याला चपलेने चांगलाच चोप दिला.

मुलींचा रुद्रावतार पाहून स्थानिक नागरिकांनीही या तरुणालास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे काम बोडवड पोलीस ठाण्यात सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विद्यार्थिनींच्या हिमतीला दाद दिली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now