⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | नोकरी संधी | पदवीधरांसाठी गुडन्यूज ! मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगाभरती, 81100 पर्यंत पगार मिळेल

पदवीधरांसाठी गुडन्यूज ! मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगाभरती, 81100 पर्यंत पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट क वर्गातील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तब्बल १८४६ जागांसाठी ही भरती होत असून पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. BMC Recruitment 2024

यासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आज म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. BMC Bharti 2024

प्रवर्गनिहाय जागा
या भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या १८४६ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १४२, अनुसूचित जमातींसाठी १५० जागा, विमुक्त जाती- (अ) ४९ जागा, भटक्या जमाती (ब) ५४ जागा, भटक्या जमाती (क) ३९ जागा, भटक्या जमाती (ड) ३८ जागा, विशेष मागास प्रवर्ग- ४६, इतर मागासवर्ग ४५२, ईडब्लूएस- १८५, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मगास- १८५ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०६ जागा रिक्त आहेत. याशिवाय समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.

शैक्षणिक पात्रता :
(i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
आणि
(ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
किंवा
(ⅲ) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुर्णासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे असावे.
इतका पगार मिळेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५००-८११०० बेसिक पगार मिळेल

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी आणि संभाव्य अडचणींसाठी ९५१३२५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान उमेदवारांना संपर्क साधता येणार आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.