---Advertisement---
जळगाव जिल्हा

रक्तदान हे जीवनदान, शिवसैनिकांचे स्तुत्य पाऊल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

खेडी येथे शिवसेना व मुक्ति फाउंडेशनतर्फे विशेष रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Gp khedi

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२५ । वंदनीय शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती आणि भारतीय गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला खेडी येथे शिवसेना, जीपीएस परिवार व मुक्ति फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

---Advertisement---

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, रक्तदान हे पीडित आणि गंभीर रुग्णांसाठी जीवनदान असून, रक्तदाता हा ईश्वर समान असतो. शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी हे पवित्र कार्य पुढे नेणे हे अत्यंत प्रशंसनीय आहे.रक्तदानासारख्या महत्त्वाच्या उपक्रमासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात माजी. जि. प. सदस्य गोपाल चौधरी, कृ.ऊ.बा.चे माजी सभापती कैलास चौधरी, पं.स. चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शाखा प्रमुख मच्छिंद्र सपकाळे, सरपंच तेजस कैलास चौधरी, उपसरपंच अतुल सपकाळे, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, डॉ. रवींद्र पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात अनेक रक्तदाते आणि शिवसैनिकांसह खेडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या उपक्रमाद्वारे शेकडो गरजू रुग्णांना मदत होणार असून, सामाजिक एकजुटीचा संदेश दिला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुकुंदराव गोसावी यांनी केले तर आभार मच्छिंद्र सपकाळे यांनी मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---