⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 13, 2024

भुसावळातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । भुसावळ  शहरात अमृत योजनेच्या जलवाहिनीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तसेच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान,  शहरातील रस्त्याच्या कामाला गती आली असून प्रभाग क्रमांक 19 मधील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन देऊन भाजपने पालिकेची सत्ता काबीज केली. मात्र गेल्या चार वर्षात  रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्यामुळे शहर वर्षांमध्ये  तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  यात मुख्य अडथळा हा अमृत योजनेचा असल्याने रस्त्याचे काम रखडले होते. मात्र आता 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता शहरात रस्त्याच्या कामाला गती आली आहे.

 

नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये देखील रस्ते डांबरीकरण सुरू झाले आहे. या प्रभागात महामार्गापासून वांजोळा रोड, केळकर हॉस्पिटल, आकाश फोम, श्रीराम मंदिर पासून काशी विश्वेश्वर मंदिर, हनुमान नगर, श्रीरामनगर या भागात डांबरीकरण केले जात आहे. चार ते सहा महिन्यात संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल याच्या निविदा देण्यात आल्या असून संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. काही ठिकाणी नळजोडणीचे काम बाकी असून नळ कनेक्शनसाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असून मधील भाग सोडून सर्व प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व रस्त्याचे काम केले जाणार आहे. असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सांगितले. भाजप माजी शहराध्यक्ष पुरूशोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, डॉ.आजनालकर, डॉ. किरेंगे, ठाकूर काका, निलेश वानखेडे, मोद सरोदे भाऊ, गुड्डू सोनार, कॉन्ट्रॅक्टर बढे, डॉ. आशुतोष केळकर, वॉर्डतील जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २२ मार्च, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्ता लोकांचा जमाव करण्यास संबंधित भागातील पोलीस प्रभारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नसल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून वयोवृध्दाचे डोके फोडले

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । शहरातील रामेश्वर कॉलनीत दारूपिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने  लोखंडी रॉडने वयोवृध्दाचे डोके फोडल्याची घटना गुरुवारी घडलीय.  

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश बालु गव्हाळे (वय-६१) रा. जवाई गल्ली, रामेश्वर कॉलनी येथे कुटुंबासह राहातात. गुरूवारी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्याच गल्लीतील खुशाल बाळू मराठे रा. रामेश्वर कॉलनी याने गणेश गव्हाळे यांच्या मुलगी मिना पिंकेज हरदे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

 

दरम्यान, पैसे न दिल्याने शिवीगाळ केली. याचा जाब गणेश गव्हाळे यांनी विचारला असता खुशाल मराठे याने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच आजूला पडलेला लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गणेश गव्हाळे यांच्या‍  फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.

…ही तर जळगावची बदनामी ; आशादीप वसतीगृह प्रकरणावरुन खडसे आक्रमक

0
eknath khadase

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहात पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा प्रकार खोटा असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

 

“आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे,” असे एकनाथ खडसे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

 

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 4 मार्च रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल विधानसभेत मांडला. या अहवालानुसार असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात आहे.

 

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्यांना याचा व्हिडिओ काढल्याचाही आरोप केला जात होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकार खडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्यभरातून महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका करण्यात आली. याच मुद्द्यावरुन भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र, त्यानंतर जळगावमध्ये महिलांना नृत्य करायला लावण्याचा कोणताही  प्रकार घडलाच नसल्याचे नंतर समोर आले.

जळगाव जिल्हा परिषदेत कोरोनाचा धोका वाढला

0
jalgaon-zp-building

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जळगाव जिल्हा परिषदेत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधी तीन कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आल्यानंतर अजून दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी बाधित आढळून आले आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कोरेानाची लागण झाली होती. आता कॉरोनच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा अनेकांना कोरोना आढळून येत असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्याच आठवड्यात तीन कर्मचारी बाधित आढळल्यानंतर प्रशासनाने काही निर्बंध लावले होते. परंतु यात अजून कठोर निर्बंध लावण्याची गरज असल्याचा सूर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.

भावा सांभाळून राहा : कर्णकर्कश सायलेन्सर लावलेल्या १३ बुलेट जप्त

0
jalgaon-bullet
कर्णकर्कष हाॅर्न व सायलेन्सरने फटाके फाेडणाऱ्या दुचाकींवर कारवाई करतांना पाेलिस

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । शहरात प्रेशर हॉर्न व कर्कष सायलेन्सर लावुन टवाळकी करणाऱ्या तरुणांवर बहुत शाखेने अचानक सर्जिकल स्ट्राईक केला. काल दिवसभरात१३ बुलेट वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त करत त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा दंड वसुल केला.

काही टवाळ तरुण गाड्यांचे साधे सायलेन्सर बदलवुन मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून शहरातील काही भागात तावलगिरी करतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, शासकीय कार्यालय, न्यायालय अशा सायलेंट झोनमध्ये ध्वनी प्रदुषण होऊन नियम मोडलेजात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या.

पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी शहरात बुलेट चालकांविरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरु केला.यावेळी शहरातील महत्त्वाच्या चौकांमधून एकुन १३ बुलेट जप्त करण्यात आल्या. येत्या काही दिवसात हि कारवाई अजून तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुनगर यांनी दिली आहे.

सावधान : तुम्ही मनपा थकबाकीदार असाल तर तुमचे नळ कनेक्शन बंद होणार

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । काेराेना काळात करवसुलीवर झालेला परिणाम लक्षात घेता महापालिकाने कर वसुलीसाठी कडक उपायोजना करण्याचे ठरवले आहे. यावेळी माेठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करताना नळ कनेक्शन देखील बंद करण्यात येणार आहे.

जळगाव महापालिकेने ७ जानेवारीपासून थकबाकीदारांसाठी अभय याेजना सुरू केली होती.  १० मार्चपर्यंत ही याेजना सुरू राहणार आहे.या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत २५ टक्के सुट मिळत आहे. अनेक वर्षांपासून कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत ३ असे संपुर्ण शहरात १२ विशेष पथक मनपातर्फे तयार करण्यात आले आहेत.

१५ लाख रूपयांची बॅग लांबविणाऱ्या भामट्यांना अखेर अटक

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १५ लाखांची बॅग लांबवणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी आज उल्हासनगर येथून अटक केली. त्या दोघे भामट्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एमआयडीसीतील प्रभा पॉलीमर कंपनीचे कर्मचारी महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय-५१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे १ मार्च २०२१ रोजी दुपारी ५ वाजेता आर. कांतीलाल जोशी पेठे मटन मार्केटजवळ येथून ५ वाजेच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊनच्या गणपती नगर कडे जाण्यासाठी निघाले होते. पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ त्यांची पैशांची बॅग या भामट्याने बंदुकीचा धाक दाखवून लांबवली होती.

यावेळी झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. भावसार यांच्या हातातील १५ लाख रूपयांची बॅग घेवून चोरट्यांनी दुचाकी जागेवर सोडून एकाच दिशेने पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळावर सोडून दिलेल्या दुचाकीच्या चेसीस नंबरवरून संशयित आरोपी मनोज खुशाल मोळक व विक्की उर्फ रितीक राणा दोन्ही रा. मोहाडी ता.जि.धुळे या दोघांचे संशयित नावे समोर आले. पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली होती. आज दोघांना एमआयडीसी पोलिसांनी उल्हासनगर येथून दीपक सोनार याच्या घरून अटक केली.

पुढील कारवाईसाठी दोघांना जळगावात आणण्यात येत असून त्यांच्याकडून साडेनऊ लाख रूपये हस्तगत केले आहे.

काळजी घ्या : जळगाव जिल्ह्यात आज ५४८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

0
jalgaon-corona-update

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । आज जळगाव जिल्ह्यात ५४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. समाधानकारांक बाब म्हणजे आजच २४५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आज जळगाव शहर आणि बोदवड तालुक्यात प्रत्येक एक असे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर, भुसावळ, चोपडा, जामनेर आणि चाळीसगाव तालुक्यातअधिक संसर्ग आढळून आला आहे.

आजची दिनांक ४ मार्च २०२१ची कोरोना आकडेवारी

जळगाव शहर- २४८, जळगाव ग्रामीण- ६, भुसावळ-४६, अमळनेर-२, चोपडा-८३, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-८, यावल-०, एरंडोल-३, जामनेर-४५, रावेर-२४, पारोळा-१७, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्हे २ असे एकुण ५४८ रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार ६२ हजार ६५० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार ६४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजवर जळगाव जिल्ह्यात १ हजार ३९६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.