⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना कोरोनाची लागण

0
gulabrao wagh

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आराधना हॉस्पिटलमध्ये  उपचारार्थ दाखल करण्यात आले असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन गुलाबराव वाघ यांनी केले आहे.

सर्वांच्या सद्भावना आणि आर्शिवादाने आपण लवकरच पुन्हा सार्वजीनक जिवन आणि जनतेच्या सेवेत सक्रीय होईल असा विश्‍वास गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना त्रास जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी आपला स्वॅब दिला आणि रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथील आराधना हॉस्पिटलमध्ये स्वत:ला उपचारार्थ दाखल करून घेतले आहे.

घाबरण्याचे कारण नाही. मात्र, सर्वांनीच काळजी घेण्याचा सल्ला गुलाबराव वाघ यांनी दिला आहे. दरम्यान, उपचार करणारे डॉ.सुयश पाटील आणि डॉ.धिरज पाटील यांनी गुलाबराव वाघ यांची प्रकृतीस्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. गुलाबरावांना कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, 14 दिवस त्यांना विलगीकरण कक्षातच रहावे लागणार आहे. शिवसैनिक आणि भाऊंवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांना भेटण्याचे टाळावे. दुरध्वनीवरूनही संपर्क साधू नये. औषधोपचारांसह सक्तीचा आराम त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रस्ता दुरूस्ती न झाल्यास शिवसेना करणार लोटांगण आंदोलन

0
shivsena vinod padar

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती जगजाहीर आहे. यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बोदवड ते साळशिंगी या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी विनोद पाडर यांनी दिला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे कि, बोदवड ते साळशिंगी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यांमुळे वारंवार अपघात घडतात. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदन दिली. मात्र, अद्यापही दखल घेतली नाही.

यामुळे याविरोधात शिवसेना पदाधिकारी विनोद पाडर यांनी आक्रमक भूमिका घेत १३ मार्च रोजी लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जि.प.ची अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन की ऑफलाईन ; १५ मार्चला निर्णय

0
jalgaon-zp-building

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा विचार सुरू आहे. याबाबत १५ मार्च राेजी हाेणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

 

येत्या १५ मार्च राेजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समितीची सभा आयाेजीत करण्यात आली आहे. या सभेत अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाणार आहे.

महापाैर व उपमहापाैर निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरु

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ ।महापाैर व उपमहापाैर निवडीसाठी मंगळवारपासून प्रक्रिया सुरू हाेत आहे. ९ ते १६ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नगरसचिव कार्यालयात नामनिर्देेशनपत्र घेता येणार आहेत. 

त्यामुळे कार्यालयीन पाच दिवसात दाेन्ही महत्वाच्या पदांसाठी काेण काेण अर्ज घेते याकडे लक्ष लागून आहे. महापाैर भारती साेनवणे व उपमहापाैर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च राेजी संपणार आहे. नवीन महापाैर व उपमहापाैर निवडीसाठी १८ मार्च राेजी सकाळी ११ वाजता विशेष महासभेचे आयाेजन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना काळातील सोनावणे दाम्पत्याने केलेल्या कामामुळे त्यांना मुदत वाद द्यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेत टंकलेखक, लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या  ३२ वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे उघडकीस आली आहे. जितेंद्र हेमराज पवार (रा.कांचननगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याविषयी सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सायंकाळी मृत जितेंद्र पवार हा जवखेडे खुर्द येथे चुलत भाऊ पंडित पवार यांच्याकडे मुक्कामी आला होता. सोमवारी सकाळी घरात न दिसल्याने पंडित यांनी जितेंद्रच्या पत्नीला जळगावात फोन करून विचारणा केली. मात्र, फिरण्यासाठी गेला असेल म्हणून दुर्लक्ष केले. दुपारी नरेंद्र पाटील यांच्या विहिरीत जितेंद्रचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. कैलास पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. जवखेडा खुर्द येथे अंत्यसंस्कार झाले. जितेंद्रच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

अमळनेरकरांसाठी खुशखबर : पाडळसरे धरणाला मिळणार १३५ कोटी

0
padalase dharan anil bhaidas patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । अमळनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पाडळसरे धरणाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. यावेळी पाडळसरे धरणासाठी १३५ कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली. तसेच अमळनेरात प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी १४ कोटी १७ लाखांची तरतूद केली आहे.

निधीअभावी पाडळसरे धरणाचे काम बंद पडले होते.हे काम मार्गी लागावे यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे निधी मिळाल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे सरकार फसवे सरकार : गिरीश महाजन

0
girish mahajan

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जनहिताच्या कोणत्याही उपयुक्त योजनांचा समावेश नसून जनतेच्या तोंडला पाने पुसण्यात आली असल्याची टीका  महाजन यांनी केली आहे. 

 

कर्जमाफीच्या योजनेत ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकर्‍यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब आहे. महाराष्ट्रात ८० टक्के शेतकर्‍यांची कर्ज घेण्याची मर्यादाच ५० हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळणार नाही. राज्यात अनेक प्रकल्प प्रलंबीत आहेत. आमच्या काळात आम्ही सगळ्या प्रकल्पांना सुप्रमा देऊनही महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पांसाठी ठोस अशी कुठलीही तरतूद केली नाही. पेट्रोल-डिझेलच्या संदर्भात केंद्राविरोधात राज्यात आंदोलने केली जातात. मग राज्य सरकारने तरी कुठे इंधन दरवाढीपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे ? इंधन दरवाढीपासून कुठलीही सवलत या सरकारने दिलेली नाही, त्यामुळे त्यांनी आता केंद्रावर टिका करण्याचे धाडस करू नये.

 

आ. महाजन पुढे म्हणाले की, भाजपच्या काळातील बहुतांश योजना यावेळेच्या अर्थसंकल्पात आहेत. ज्यावर आधीच तरतूद केली गेली आहे. यांनी नवीन असे काहीही केले नाही. आरोग्यावर मोठी तरतूद केल्याचे ते म्हणताय पण आधीच्या तरतूदींचे काय? त्या तरी पुर्ण झाल्या का? त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली आहे.

लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ ।दाखल गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. नाईक विलास सोनावणे ( बक्कल नं.२७८६ , रा.अमळनेर ) असे या आरोपी पोलिसांचे नाव आहे. 

 

धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु येथील ४८ वर्षीय तक्रारदाराने  ही लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती. पोलीस नाईक सोनावणेयांनी  ६ मार्चरोजी तक्रारदाराकडे या रकमेची मागणी केली होती.

 

तक्रारदार यांच्या विरूध्द धरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भादवि कलम- ४२० च्या गुन्ह्याचा तपास आलोसे यांचेकडे असुन गुन्ह्याचे अनुकूल चार्जशीट न्यायालयात पाठविण्याच्या मोबादल्यात आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 19,000/- रूपयांची लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडे असलेले डिव्हाइस हिसकावून नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.११९/२०२१ भ्र.प्र.अ.-कलम-७ सह कलम-३९२, २०१, १८६ भादवि अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या या  सापळा पथकात उप अधीक्षक   गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक . निलेश लोधी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर.   यांचा समावेश होता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक   सुनील कडासने , अपर पोलीस अधीक्षक  निलेश सोनवणे,पोलीस उपअधीक्षक .विजय जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला  होता

बहिणाबाई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा प्रा.ई.वायुनंदन यांनी स्वीकारला पदभार

0
prof

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा.ई.वायुनंदन यांनी आज मावळते कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून स्वीकारला.

 

मावळते कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठवला होता.  त्यामुळे राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती केली होती.   सोमवार ८ मार्च रोजी सकाळी प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला.

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन परीक्षा शंभर टक्के यशस्वी करून दाखविल्या. आपण  मीतभाषी असून बोलण्यापेक्षा कामावर अधिक विश्वास आहे. या विद्यापीठाने तंत्रज्ञानात प्रगती केलेली असून सर्वांना एकत्र व सोबत घेऊन काम केले जाईल, असे प्रभारी कुलगुरू म्हणाले आहे.

 

प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही पवार यांच्या हस्ते प्रा.पी.पी.पाटील व प्रा.वायुनंदन यांचा शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती वायुनंदन यांचा सत्कार व्य.प सदस्य डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहूलीकर यांचा कार्यकाळ देखील प्रा.पी.पी.पाटील यांच्या सोबत संपुष्टात आल्यामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्या हस्ते प्रा. माहुलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी. फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक बंडू पाटील, प्रा.जितेंद्र नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्रा.संजय शेखावत, प्राचार्य बी.युवाकुमार रेड्डी, एस.आर.गोहील आदी उपस्थित होते.