⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

जनता कर्फ्यू : १५ मार्चपर्यंत विद्यापीठ बंद राहणार

0
kbc nmu

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहरात ११ मार्च रोजी रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ८ पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर केल्यामुळे या कालावधीत विद्यापीठ बंद राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जळगाव शहर महानगर पालिका हद्दीतील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठ १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील.

अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून

दरम्यान, जनता कर्फ्युच्या काळात पुर्व नियोजित परीक्षांचे ऑनलाईन, आफॅलाईन कामकाजाची कार्यवाही सुरू राहील. संबंधीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत परीक्षेच्या कामासाठी उपस्थित रहावे असेही आवाहन प्रभारी कुलसचिव प्रा. बी.  व्ही. पवार यांनी परीपात्राद्वारे केले आहे.

सूरज झंवरला उच्च न्यायालयाचा झटका ; रिटपिटिशनसह जामीन अर्ज फेटाळला

0
court

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या (बीएचआर) आर्थिक घोटाळ्यातील संशयित सूरज झंवरला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे. कारण सुरज झंवर याने दाखल केलेल्या रिट पिटीशनसह जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

 

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सूरज सुनील झंवर याने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशनसह जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. यात सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद करतांना सूरज याच्याविरुध्द अनेक पुरावे आहेत. त्याचा गुन्ह्यात सहभाग आहे. सूरज व त्याचे वडिल सुनील झंवर या दोघांचे कार्यालय एकच होते. नावालाच त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या, फर्म स्थापन केलेल्या असल्याचे सांगितले. यामुळे न्यायालयाने त्याची रिट पिटीशन फेटाळून लावत जामीन अर्ज देखील नाकारला.

 

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर हे कामकाज झाले. सूरजचे वडिल सुनील झंवर याला अटकेपासून १७ मार्चपर्यंत दिलासा मिळालेला आहे.

विद्यापिठात प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्त्यांची घोषणा

0
kbc nmu

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केलेल्या नियुक्त्या खालील प्रमाणे :

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून प्राचार्य आर. एस. पाटील तर प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून डॉ. एस. पी. शेखावत (बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव) व प्राचार्य व्ही. आर. पाटील (फार्मसी महाविद्यालय, फैजपूर)यांची नियुक्ती करण्यात आली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य पी. पी. छाजेड (पालेशा महाविद्यालय, धुळे), मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य पी. एम. पवार (धनदाई कला महाविद्यालय, अमळनेर) तर प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य बी. युवाकुमार रेड्डी (मणियार विधी महाविद्यालय, जळगाव), आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठातापदी प्राचार्य अशोक राणे (केसीईचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली.

लंडनच्या यॉर्क विद्यापीठातील प्रदर्शनात गांधी रिसर्च फाउंडेशनचा सक्रिय सहभाग

0
gandhi teertha

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । लंडन येथील यॉर्क विद्यापीठात आयोजीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्याख्यानमालेत जळगावच्या गांधी रिसर्च फाऊंडेशनने सक्रिय सहभाग नोंदवला.

महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढून १२ मार्च १९३० रोजी मीठाचा सत्याग्रह सुरू केला. ही घटना शतकी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. या औचित्याने लंडन येथील यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली होती.  या उपक्रमासाठी छायाचित्रे व दस्तावेज गांधी फाऊंडेशनमार्फत पुरविण्यात आला.

फाऊंडेशनचे के. प्रो. गीता धरमपाल आणि संपादक डॉ. आश्‍विन झाला यांनी दांडी यात्रा व मीठाच्या सत्याग्रहाचे वैश्‍विक प्रभाव याबद्दल ऑनलाइन मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाकरिता यॉर्क युनिव्हर्सिटीचे प्रो. माइल्स टेइलरयांनी जानेवारी २०२० मध्ये जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनला भेट दिली होती. त्या दरम्यान संग्रहालय आणि अभिलेखागाराचे अवलोकन केल्यानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनला त्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आवाहन केले होते.

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जळगाव शहरातील कांचननगरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. 

ललिता उर्फ हर्षाली भागवत साळुंखे असे या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. हर्षाली लहान असतानाच आई, वडीलांचे निधन झाल्याने या घटनेविषयी हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षाली हिच्या आईवडीलांचे निधन झालेले असल्याने ती भाऊ मयूर याच्यासह कांचननगरात आत्याकडेच वास्तव्याला होती. बुधवारी आत्या व भाऊ मयुर कामानिमित्ताने बाहेर गेले होते. यावेळी घरी एकट्या असलेल्या हर्षालीने ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील भांडे पडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारच्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी हर्षालीने आत्महत्या  केल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळाल्यावर शनीपेठ पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक यशोदा कणसे,  हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले व अयुब खान यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून  मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी हर्षालीचा भाऊ मयुर साळुंखे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.

वेळीच सावध व्हा : आज जळगावात ९८३ नवीन कोरोना रुग्ण

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांचा कोणताही उपयोग दिसून येत नाहीय. जिल्ह्यात आज दिवसभरात ९८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

जळगाव शहरात २२२ तर जामनेर तालुक्यात १६३ व चोपडा १३३ रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान आज ४४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. चिंतेचा विषय असा की, आज ६ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

आजच्या कोरोना रिपोर्टनुसार आजवर जिल्ह्यात एकुण ६६ हजार ७२६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५९ हजार ५८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार ७२५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज ०६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा १४२१ वर गेला आहे.

यावल कृउबा समितीला सहा महीन्यांची मुदतवाढ

0
yaval kruuba samiti has been given an extension of six months

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुनश्च सहा महीन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. 

निवडणूका नियत झालेल्या राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पत संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणुका पुनश्च ९ मार्च २०२१ पासून ते ८ / ९ / २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे शासन आदेश जयंत भोईर कार्यसन अधिकारी , महाराष्ट्र शासन यांचे पत्र प्राप्त झाले आहे.

 

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने व चोपडा व यावल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे,आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला पुनश्च सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी संचालक मंडळाची मुदतही ८/ ९ / २०२० रोजी संपुष्टात आली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६४ कलम१४ (३) अनुसार शासन नियमा अधिकाराचा वापर करीत १७ /९ /२०२० रोजीच्या आदेशान्वये ८ / ३ / २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्यात पुनश्च उदभवलेल्या कोरोना विषाणु( कोवीड१९च्या गंभीर परिस्थितीचा विचार करता संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात प्रबळ अमलबजावणी सुरू आहे. निवडणुका नियत झालेल्या राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पत संस्था  व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणुका पुनश्च ९ मार्च २०२१पासुन ते ८ / ९ / २०२१पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे शासन आदेश जयंत भोईर कार्यसन अधिकारी , महाराष्ट्र शासन यांचे पत्र प्राप्त झाले आहे.

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर

0
kishor patil

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांची पुरहानि दुरुस्तीसाठी आमदार किशोर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात गांभीर्याने चर्चा केली. अशोक चव्हाण यांनी रस्ते व पुलांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाची दखल घेऊन ९ कोटी रुपये निधी मंजूर करून दिला. तथा प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. 

 

किशोर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात रस्ते व पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून वारंवार भेटी घेऊन रस्ते व पुलांची झालेली दुरावस्था गांभीर्याने लक्षात आणून दिली. याची तातडीने दखल घेऊन रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठीच्या ९ कोटी रुपयांचा मंजुरी दिली. सदर विकासकामांसाठी राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आदेशनव्ये गुलाबराव पाटील (पालकमंत्री जळगाव) यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री महोदय तथा पालकमंत्री शतशः आभार विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी व्यक्त केला आहे. सदर विकास कामे निधी पुढीलप्रमाणे

शेवाळे गावाजवळील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १३० लक्ष रुपये, शिंदाड  गावाजवळील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १३० लक्ष रुपये, वारखेडी – भोजे – पिपंळगावव रास्ता प्र.जि.मा. ३६ कि.मी. १३/०० मधील रस्त्याची  पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १८० लक्ष रुपये, पाचोरा – वरखेडी – पहूर रस्ता रा.मा.

१९ किमी १९७/६०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ४७ लक्ष रुपये, पाचोरा – वरखेडी – पहूर रस्ता रा.मा. १९ किमी १९७/९०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६८ लक्ष रुपये, पाचोरा – वरखेडी पहूर रस्ता रा.मा. १९ कि.मी. २००/४०० मधील रस्त्याची  पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६० लक्ष रुपये, पाचोरा – वरखेडी – पहूर रस्ता रा.मा. १९ किमी १९२/०० ते १९३/५००  मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६४ लक्ष रुपये, पाचोरा – वाडी – सातगाव रास्ता  रा.मा. ४० कि.मी. १०१/०० ते १०२/५००  पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ५६ लक्ष रुपये, कजगाव – नागद रस्ता रा.मा. ३९ किमी ६०/५०० ते ६३/५०० मधील पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६८ लक्ष रुपये,  नगरदेवळा – खडकदेवळा पिंपळगाव रा.मा. १७ रस्ता किमी ९४/०० मधील पुलाची  पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ३० लक्ष रुपये,  पाचोरा – वरखेडी – पहूर रस्ता रा.मा. १९ कि.मी. १९४/४०० मधील रस्त्यावरील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ३० लक्ष रुपये, कजगाव – नागद रास्ता रामा ३९ कि.मी. ६८ / २०० मधील वडगाव मुलाणे गावाजवळील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ३० लक्ष रुपये, ओझर खडकडेवळा रामा ३८ कि.मी. ८/०० मधील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १७ लक्ष रुपये, नेरी भामरे रस्ता प्रजिमा ५६ कि.मी. ३ / ५६  मधील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम २६ लक्ष रुपये, पाचोरा येथील शासकीय इमारतींची दुरुस्ती करणे रक्कम २३ लक्ष रुपये या प्रमाणे निधी मंजूर झाला आहे.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन ; यावल येथे चार दुकाने सील

0
 violation of rules seals four shops at yaval

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ ।कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने चार व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करत चारही दुकाने सील करण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार महेश पवार आणी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणी नगर परिषद प्रशासन यांच्या माध्यमातुन आज शहरात रस्त्यावर उतरून केली. 

 

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरूद्ध कारवाई बडगा उगारला आहे. आज यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, नगर परिषद प्रशासनचे विजय बढे, स्वच्छता अधिकारी शिवानंद कानडे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.

यात शहरातील बुरूज चौकातील पटेल सेन्टर, पापुलर झेरॉक्स व स्टोअर्स, बसस्टॅन्ड परिसरातील जय हिंगलाज स्विट ॲण्ड नास्ता सेन्टर या व्यवसायीकांवर ५ पेक्षा अधिक लोकांना जमविणे तसेच मास्कचा वापर न करणे अशा कोरोना नियमांचे उल्लंघन करतांना आढळुन आल्याने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत त्यांच्या दुकांनासिल करण्यात आले आहे . महसुल प्रशासन , पोलीस आणी नगर परिषदच्या संयुक्त कारवाईचा यावल शहरातील बेसावध व बेशिस्त वागणाऱ्यावर या धडक कारवाईचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.