⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

ऐकावं ते नवलच… स्विफ्ट कारमधून चोरायचा बकऱ्या

0
goats to steal from a Swift car

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल प्रतिनिधी । यावल चोपडा रोडवर असलेल्या अकसानगर वसाहतीतुन स्विफ्ट कारमध्ये येऊन बकऱ्या चोरणाऱ्या भामट्यास पकडण्यात आले आहे. 

या संदर्भात अधिक माहीती अशी की, यावल शहरातील अक्सानगर परिसरातुन आज सोमवार दि. १ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमपी ०९ जीके ९४५३या स्विफ्ट कारमधून ईम्रान रफीक पठाण (वय ४८ वर्ष राह. ईन्दौर मध्य प्रदेश) हा चार बकऱ्या गाडीच्या डिकीत भरून चोरून घेवुन जात होता. या बकऱ्यांची अंदाजित किंमत ४५ हजार रुपये आहे. अक्सानगर परिसरातुन अजुन काही बकऱ्या चोरीच्या प्रयत्नात असतांना सर्तक व जागृत नागरिकांना तो आढळुन आलेल्याने परिसरातील नागरीकांनी त्यास रंगेहाथ पकडुन त्यास चांगला चोप दिला.

वृत्त कळताच तात्काळ दखल घेत पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, कर्मचारी असलम रवान, भुषण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली व बकऱ्या चोरी करणाऱ्या ईम्रान रफीक पठाण यास वाहनासह ताब्यात घेतले आहे. घटना स्थळावरून दोन जणं फरार होण्यात यशस्वी झाले. सदरच्या या बकऱ्या फैजपुर परिसरातुन चोरून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक : भरदुपारी शहरात बंदुकीच्या धाकावर पंधरा लाख रुपये लुटले !

0
gun-crime

जळगाव लाईव्ह न्यूज : शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळून पल्सरवर आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर दोघांकडून तब्बल पंधरा लाख रुपये लुटून नेल्याची खळबळजनक घटना आज दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, प्रभा पॉलीमार कंपनीचे पंधरा लाख रुपये घेवून संजय विभांडिक आणि संजय भावसार हे दोघं जण गणपती नगरकडे जात होते. दुपारी ५ वाजून २० मिनिटांनी पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पद्मावती मंगल कार्यालयाजवळ अचानक पल्सरवर आलेल्या दरोडेखोरांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, भरदिवसा झालेल्या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या वृत्ताला एमआयडीसी पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज ३९६ कोरोनाबाधित आढळले, तर १२० झाले बरे !

0
jalgaon-corona-update

जळगाव लाईव्ह न्यूज :  जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३९६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १२० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १४५, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ- ३६, अमळनेर- १२, चोपडा-६४, पाचोरा-०१, भडगाव-०५, धरणगाव-०२, यावल-०१, एरंडोल-०१, जामनेर-०२, रावेर-०५, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२, इतर जिल्ह्यातील-०६ असे एकुण ३९६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६१ हजार २७४ पर्यंत पोहचली असून ५७ हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १३८७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २७७९ रुग्ण सध्या उपचार घेताय.

‘तिच्यासोबत लग्न करणार का ?’; धरणगाव बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा आरोपीला प्रश्न !

0
court

धरणगाव (प्रतिनिधी) : एका १६ वर्षीय शाळकरी मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल धरणगाव येथील मोहित चव्हाण याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी आरोपीला तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली, त्यामुळे आज देशभरातील माध्यमांचे या सुनवाईकडे लक्ष वेधले गेले.

या प्रकरणातील आरोपी मोहित २४ वर्षांचा असून महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीत (महाजेनको) तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. लांबच्या नात्यात असलेल्या एका मुलीवर ती १६ वर्षांची असताना अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल मोहित याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलीने घटनेच्या साधरण दोन वर्षांनंतर पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यावेळी आरोपीच्या आईने या मुलीला सज्ञान झाली की तिचे तुझ्याशी लग्न लावून देईन. तसेच तिला मी सून म्हणून स्वीकारेन, पण माझ्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार करू नका, असे ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून दिले होते. परंतु लग्न न झाल्यामुळे पीडिता कोर्टात पोहोचली.

याअगोदर ट्रायल कोर्टाकडून आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाकडून मात्र ते फेटाळण्यात आले.

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांचा राजीनामा

0
kalpana-patil-rashtrwadi-jalgaon
कल्पना पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी

जळगाव लाईव्ह न्यूज टीम | राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तीन वर्षापासून या पदावर काम करीत असल्याने नवीन तरुण महिलेला संधी मिळावी म्हणून राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा दाैऱ्यावर येऊन गेले हाेते. स्वत: महिला जिल्हाध्यक्षा व मुलगा अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष अशी दाेन प्रमुख पदे एकाच कुटुंबात हाेती. राजीनामा दिल्याने रिक्त हाेणाऱ्या जागेवर जामनेर तालुक्यातील वंदना अशाेक चाैधरी, सावदा येथील नगरसेविका रेखा राजेश वानखेडे, माजी अध्यक्षा मंगला पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शिवसेना, युवाशक्तीतर्फे शहरात मास्क वाटप

0
yuvashakti-shivsena-mask
महिलेला मास्क देताना शिवसेना महानगर जळगाव व युवाशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य.

जळगाव लाईव्ह न्यूज टीम : शिवसेना महानगर जळगाव व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर “मी जबाबदार’ या मोहिमेंतर्गत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मास्क नसलेल्यांना २८०० नागरिकांना मास्क वाटप करून जनजागृती करण्यात आली.

शहरातील विविध चौकाचौकात हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्य चौकातील वाहतूक सिग्नलवर पोस्टरद्वारे कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली. ‘मास्क घाला कोरोना टाळा, मी जबाबदार जळगावकर मास्क घालणार कोरोना टाळणार, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार, सर्व नियमांचे पालन करणार, मी जबाबदार जळगावकर, कोरोना वाढत आहे, काळजी घ्या मास्क घाला’ या घोषणा देण्यात आल्या. शिवसेना जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, ज्योती शिवदे, जाकीर पठाण, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, वासिम खान, नीलेश देशमुख, प्रीतम शिंदे, सौरभ कुलकर्णी, सागर सोनवणे, प्रशांत वाणी, ईश्वर राजपूत, इकबाल शेख, दीपक कुकरेजा, पूनम राजपूत, संजय सांगळे, अश्फाक शाह, श्रीकांत आगळे, शोएब खाटीक आदी उपस्थित होते.