जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन दि.२१ एप्रिल रोजी करण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासत आहे. एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी या नात्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे शिबिरात महिला, युवती, व दिव्यांगांनी देखील आपला सहभाग नोंदविला .जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागचे डॉक्टर उमेश कोल्हे रक्तसंक्रमण अधिकारी, लक्ष्मीकांत त्रिपाठी, राजेश शिरसाट, भरत महाले, निलेश पवार, सुभाष सोनवणे पंकज चौधरी, संगीता वंजारी यांचे कामी सहकार्य लाभले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी, उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, अमित पाटील अध्यक्ष एरंडोल कॉलेज, आनंद दाभाडे सामाजिक कार्यकर्ता,अशोक चौधरी, डॉ. राजेश एन. महाजन, डॉ. मुकेश चौधरी, बि. एस चौधरी, डॉक्टर नरेंद्र पाटील, नगरसेवक नितीन महाजन, जगदीश ठाकूर, नगरसेवक कुणाल महाजन, अतुल महाजन, सुनील चौधरी, छोटू पहिलवान, जितेंद्र महाजन यांच्या उपस्थितीत शिबिरा शुभारंभ झाला.
जय श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन पाटील सर यांनी रक्तदान व सामाजिक दातृत्व याविषयी प्रास्तविक केले, सूत्रसंचालन उपाध्यक्ष अमर महाजन यांनी केले, आभार सचिव प्रदीप फराटे, यांनी मानले. शिवा महाजन, सदानंद पाटील , ज्ञानेश्वर गुजर, जंगलु पाटील,बाळा पाटील,कृष्णा गुजर, अनंत महाजन, आबा महाजन, अजय महाजन ,संजय महाजन ,दिनेश पाटील.ओम पाटील, पुष्पक पाटील, यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.