⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 13, 2024

जिल्ह्यातील १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे वितरण ; जिल्हाधिकारी राऊत

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील 136 खाजगी हॉस्पिटल्सना 760 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

आज (24 एप्रिल) रोजी जिल्ह्याला 760 रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणा-या 117 खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार 315 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत करण्यात आल्या आहेत. तर 19 कोविड हाॅस्पिटलला 436 व्हायल्स कंपनीकडून घाऊक विक्रेत्यांमार्फत परस्पर वितरण होत आहे. तर प्राप्त साठ्यापैकी 10% साठा हा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. 

संबंधित कोविड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे २४ X ७  रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांचेमार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत. 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याकरीता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

शिकारी कुत्र्यांनी घेतला नील गायीचा जीव

0
jalgaon enws

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । येथून जवळच असलेल्या क.ब.चौ.उ.म. विद्यापीठात  कुत्र्यांच्या हल्ल्यात नर नीलगायीचा मृत्यू झाला आहे.

क.ब.चौ.उ.म. विद्यापीठातील शिक्षक भवनच्या रस्त्यावर निलगायीवर १५ ते २० कुञे हल्ला करीत असल्याचे शिक्षक भवनचे कर्मचारी अशोक पाटील यांच्या निर्देशनास आले. त्यांनी लागलीच पळत जाऊन त्यांना उसकावण्याचा प्रयत्न केला असता कुञे त्यांच्या अंगावर देखील धाऊन आले, तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षक अमोल पाटील यांच्या मदतीने कुञ्यांना हुसकावून लावले. कुञांनी मोठ्या प्रमाणात जखमी केल्यामुळे निलगायीचा तडफडून मृत्यू झाला. 

सुरक्षा रक्षक अमोल पाटील यांनी तिला पाणी पाजले परंतु गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर अशोक पाटील यांनी सदरची घटना वन्यप्रेमी अरूण सपकाळे व सुरक्षा अधिकारी शेखर बोरसे यांना सांगितले असता त्यांनी वन विभागाला कळवले. त्यानंतर वन विभागाचे वनपाल राजकुमार ठाकुर व त्यांचे 3 सहकारी यांनी वन विभागाच्या वाहनात सदर निलगायीला टाकून पुढील कार्यवाहीसाठी नेले. कुत्र्यांनी सर्वत्र हैदोस मांडला असून नेहमी कुणाला तरी चावा घेतलेला असतो.

‘ई-पास’साठी एकाच दिवसात हजारावर अर्ज : कागदपत्रे नसल्यास परवानगी रद्द

0
corona maharashtra lockdown e pass know other district travel

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला असून त्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

कालपासून संकेतस्थळ सुरू झाल्यापासून एकाच दिवसात तब्बल १ हजारावर नागरिकांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी योग्य कागदपत्रे न जोडल्यास अर्ज रद्द केला जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांतर्गत प्रवास किंवा जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी देखील ई-पास घेणे आवश्यक आहे. अंत्यविधी, लग्न सोहळा (कुटुंबातील नातेवाईक), वैद्यकीय कारणांसाठीच परवानगी दिली जात आहे. एका दिवसात तब्बल हजारावर अर्ज आलेले आहेत.

आमदार महाजन दाखवा, १० लाख मिळवा

0
girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले. जामनेरमध्ये कोरोना संकट गडद झालं असताना स्थानिक आमदार गिरीश महाजन हे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ‘आमदार गिरीश महाजन दाखवा आणि दहा लाख रुपये मिळवा’ असे फलक हातात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज जामनेर शहरात लक्षवेधी आंदोलनही केले.

संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात मागील काही दिवसापासून जामनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा परिस्थिती गेली 25 वर्ष लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने तालुक्यात थांबुन लोकांचे जीव वाचवावे प्रशासनाला हाताशी धरून जनतेची सेवा करावी हे काम सोडून आमदार साहेब भाजपाच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दंग आहेत. 

जनतेला वाऱ्यावर सोडून गायप असलेल्या आमदार महाजनांच्या अश्या वागणुकीबद्दल जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने ,”आमदार साहेब गेले तरी कुठे” आमदार दाखवा 10 लाख मिळवा  अश्या आशयाचे पत्र दाखवून शहरातील चौकात अभिनव आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेश(पप्पू) पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे युवक शहर अध्यक्ष विनोद माळी, अनिस भाई पहेलवान दिपक राजपूत सागर पाटील, किरण जंजाळ आणि अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

जळगाव एमआयडीसीतील आदर्श इंडस्ट्रीज कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग

0
jalgaon midc fire news

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन समोर असलेल्या आदर्श इंडस्ट्रीज कंपनीच्या गोडाऊन मधील लाकडाला काल शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता भीषण आग लागली.  शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. 

अग्निशमन बंबानी आग आटोक्यात आली कर्मचारी- वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, हिरामण बाविस्कर, वसंत कोळी, वाहन चालक- संतोष तायडे, नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणली.  

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांचे तात्काळ लसीकरण करा

0
pravin sapkale

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । गेल्या वर्ष भरात कोरोना संसार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील आठ ते नऊ पत्रकारांचा बळी गेला असून देखील फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना कोविड लस देण्यात आलेली नाही, हा आमच्या पत्रकार बांधवांवर अन्याय होतं असून आपण आपल्या स्तरावरून पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी तात्काळ लसीकरण करून देण्याबाबत निर्णय घ्यावा अशा विनंतीचे निवेदन राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी आज दि.२४ एप्रिल रोजी ई-मेल वर निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदन म्हटलं आहे की,कोरोना महामारी काळात देखील  आमचा पत्रकार हा जीवाची पर्वा न करता फील्डवर वृतांकन करतांना आपण पहिला आहेत. कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासन ५० लाखाची मदत करणार होतं त्याबाबत देखील अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही, कोरोना संकटात वृत्तपत्र व्यवसाय पूर्णतः कोलमडला असतांना तुटपुंज्या पगारावर, मानधनावर व वार्ताहर बांधवाना जाहिरात कमिशनवर काम करावं लागत आहे. 

अशा बिकट परिस्थिती मध्ये पत्रकार संकटात सापडला असून शासनाकडून देखील दुर्लक्षित होतं आहे तरी देखील कुठलीही तक्रार न ठेवता पत्रकारितेत सेवा करित आहे.तरी पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरण करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

जळगावात उपमहापौरांच्या पुढाकाराने प्रभाग १० मध्ये डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ

0
deputy mayor kulbhushan patil

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या विशेष पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील गट क्रमांक १७४च्या परिसरात आजपासून डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील बर्‍याचशा भागांमध्ये अमृत योजनेमुळे रस्त्यांची खराब अवस्था झालेली आहे. तर आता काही भागांमध्ये अमृत योजनेचे काम पूर्णत्वाकडे आल्याने तेथील रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील गट क्रमांक १७४ या भागात देखील अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी नागरी दलीत वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार असून यामुळे या परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

यांची होती उपस्थिती

आज महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांमध्ये नगरसेवक शफी शेख, सुरेश सोनवणे, जाकीर पठाण, अभियंता मिलींद जगताप, अजय देशमुख, अतुल बारी, दीपक पवार, नितीन पाटील, नीरज राजपूत, पंकज पाटील, योगराज पाटील, स्वप्नील पाटील, चेतन बारी, शुभम सोनवणे, धनराज गोसावी, निलेश गोसावी यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

चाळीसगाव शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये १३५ जम्बो सिलेंडरचा ऑक्सिजन प्लांट उभारणार

0
chalisgaon trama care center 135 jumbo cylinder oxygen plant

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वाढता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन, शहरातील अद्यावत असे ट्रामा केअर सेंटरमध्ये DPDC योजनेतून १३५ जम्बो सिलेंडर क्षमतेचा १ कोटी ३७ लाखांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. येत्या २ दिवसात प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

जिल्हा प्रशासनाकडे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीनुसार कोविड केअर सेंटरला ४ मेडिकल ऑफिसर, ४ स्टाफ नर्स, १० वार्डबॉय, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर, १ एक्सरे टेक्निशियन अशी २१ नवीन तात्पुरती पद तात्काळ भरली जाणार आहे.

५ व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन ऑक्सिजन बेड्सची संख्या ३८ वरून ७० इतकी वाढविण्यात येणार आहे. आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रक्त तपासणी मशीन, ऑक्सिजन Concentrator, Cell Counter, Bypape मशीन, एअर कंडिशनर, ICU बेडस, दोन बेडस मध्ये कर्टन्स, स्वछतेसाठी टाईल्स क्लिनर आदी नवीन मशिनरी उपलब्ध होणार आहे.  येत्या ८ दिवसात जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन चाळीसगाव तालुक्याला उपलब्ध होणार तसेच गरज वाटल्यास अजून ५० बेडस क्षमता तातडीने वाढविण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध करण्यात येईल, या सर्व सुविधा उपलब्ध होवून चाळीसगावकरांच्या कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. 

सावदा येथील माजी नगराध्यक्ष कोरोना पाॅझिटिव्ह

0
sawda former mayor corona positive

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेश गजानन वानखेडे हे नुकतेच कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्यांच्या कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्याचे समजताच मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी त्यांना विचारपूस केली व त्यांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल होण्याबाबत सांगितले.

राजेश वानखेडे यांनी देखील यावेळी खाजगी रुग्णालयात दाखल न होता सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेत तेथे दाखल झाले आहेत व त्यांनी सरकारी रुग्णालयावर विश्वास दाखवला.

दरम्यान त्यांची प्रकृती स्थीर असून कोरोनाचे पहिल्या लाटेत व आता देखील निरंतर रुग्ण व नागरिकांची सेवा करीत आहे अनेकांना त्यांनी याकाळात मदतीचा हात दिला. दरम्यान आजच्या कठीण काळात त्यानी राजकीय मदभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्रित येऊन शहरवासीयांची मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते.

याच दरम्यान ते पोजेटीव्ह आले व आता स्वतः सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत, दरम्यान मुक्ताईनगर येथे आ. चंद्रकांत पाटील यांनी त्याची विचारपूस केली तर येथील डॉ. राणे हे त्यांचेवर उपचार करीत आहे दरम्यान राजेश वानखेडे यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी व काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.