⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

पाचोऱ्यात तोंडावर मास्क लावा सांगितल्याच्या रागातून न.पा.च्या कर्मचाऱ्याला मारहाण ; नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतांना तोंडावर मास्क लावा सांगितल्याच्या रागातून नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बागवानसह तिघांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथे कोरोना महामारीची साकळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस शहरात संयुक्त कारवाई करीत आहे. या पालीका प्रशासनाने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ या सह तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रफिक बागवान या नगरसेवकाने तोंडावर मास्क न लावता भाजीपाला विक्री  सुरू ठेवली होती  त्यास पालिका कर्मचारी राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याने आपण तोंडावर मास्क लाऊन आपले काम करा असे सांगीतले होते.

त्यांनतर दोन दिवसांनी अनिल वाघ, राजेश कंडारे, पोलिस उपअधीक्षक विकास पाटील, सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, प्रकाश पाटील, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील हे दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्य बजावत असतांना त्या ठिकाणी नगरसेवक रफिक बागवान, महिद बागवान यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचा हात घरुन  युसुफ कालू बागवान याचेवर दंडात्मक कारवाई का केली. तूला येथे नोकरी करावयाची आहे का नाही. तू हे चांगले केले नाही. तू पोलिसांच्या नांदी लागू नको, ते आज आहेत, उद्या नाहीत असे बोलून ज्या ठिकाणी कारवाई केली होती त्या ठिकाणी घेऊन गेले व भाजीमंडीतील युसूफ बागवान यास बोलावून यांने तूझ्यावर कारवाई केली का? असे विचारले व युसुफ बागवान याने हो सांगीतल्यानंतर नगरसेवक रफिक बागवान याने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचे तोंडावरील मास काढून फेकले. व हातातील पावतीबुक फेकून दिले.

त्यानंतर तिघांनी तोंडावर व छातीवर बुक्यांनी मारहाण केली. ते अनिल वाघ हे ओक्साबोक्शी रडत असतांना तोंड दाबून ठेवले आणि शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी माझे सोबत इतर दुकानावर कारवाई करीत असलेले सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील यांनी त्यांचे तावडीतून सोडविले, यामुळे पालिका कर्मचारी वाघ याने नगरसेवक रफिक बागवान यांचेसह तिघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच नगरसेवक रफिक बागवान यांना अटक करण्यात आली आहे.युसूफ बागवान,हमीद कालु बागवान, बेपत्ता आहेत. नगरसेवक रफिक बागवान याच्यावर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचारी याना मारहाण व शासकीय कामत अडथळा निर्माण केल्या प्रकरणी. शासकीय कर्मचारी अनिल वाघ यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारी नुसार आरोपी वरती कलम -353,332,504,506(34),268,269. नुसार कारवाई करण्यात आली आहे व पाचोरा पोलीस स्टेशन चे ‘पी. आय ‘ किसनराव नजन पाटील -जर कोणी शासकीय कर्मचाऱ्या सोबत असे कृत्य केल्यास सक्त कारवाई केली जाईल

भुसावळ पालिकेच्या उपाध्यक्षपदी खडसेंचे कट्टर समर्थक प्रमोद नेमाडे यांची निवड

0
pramod nemade

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । भुसावळ येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची निवड करण्यात आली आहे. आज पालिका प्रशासनाच्या झालेल्या ऑनलाईन सभेत ही निवड करण्यात आली आहे.

भुसावळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली होती.  यासाठी दोन-तीन सदस्यांची नावे चर्चेत होती. अखेर आज या रिक्त पदावर ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची उपाध्यक्षपदी पदी निवड झाली.

प्रमोद नेमाडे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना उपनगराध्यक्षपदासाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर निवडणुकीआधी अजून एका सदस्याला दोन महिन्यांसाठी संधी मिळणार आहे.

यावल महसुल पथकाची अवैद्य गौण खनिज वाहतुकीविरुद्ध कारवाई ; दोन डंपर, दोन ट्रॅक्टर जप्त

0
yawal news

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । यावल तालुक्यात महसुल प्रशासनाच्या पथकांची विनापरवाना अवैद्य गौण खनिज वाहतुकी विरूद्ध धडक मोहीम दोन दिवसात दोन डंपर दोन ट्रॅक्टर वर झाली कार्यवाही वाळु माफीयाचे धाबे दणाणले.

या संरर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महसुलच्या पथकानेअवैद्य गौण खनिज विरूद्ध उघडलेल्या मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील किनगाव येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप व त्यांचे भागातील तलाठी बामणोद मंडळ अधिकारी मिलींद देवरे व तलाठी, यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी व तलाठी, साकळीचे मंडळ अधिकारी पि ए कडनोर व तलाठी यांनी वाळु माफीया विरुद्ध मागील दोन दिवसात राबविलेल्या कार्यवाहीच्या धडक मोहिमेत विनापरवाना अवैद्य मार्गाने वाळुची वाहतुक करणारे दोन डंपर व दोन ट्रॅक्टर तालुक्यातील विविध क्षेत्रातुन कार्यवाहीसाठी जप्त करण्यात आले. पुढील दंडात्मक कार्यवाही करीता यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. द

रम्यान तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज ची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या वाळु माफीयाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

जळगावात भरधाव वाळू ट्रॅक्टरने एकाला उडविले

0
accident logo

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । शहरातील खंडेराव नगर येथून भाजीपाला खरेदी करून जात असलेल्या सायकलस्वाराला भरधाव वाळू ट्रॅक्टरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने लागलीच पळ काढला.

पिंप्राळा हुडकोजवळील आझाद नगर परिसरात राहणारे मेहबूब खान पठाण वय-५० हे गुरुवारी सायकलने भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. भाजीपाला खरेदी करून ते घरी परतत असताना आझाद नगरजवळ भरधाव ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली.

अपघातात मेहबूब खान यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पोलीस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहे. मेहबूब खान यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/979345826140629/

आ. चिमणराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0
chimanrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । एरंडोल विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार चिमणराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आमदार चिमणराव पाटील यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांनी होम आयसोलेशन मध्येच तज्ज्ञांकडून उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, आमदार पाटील यांनी आपल्या संपर्कात आलेले अधिकारी आणि नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घेत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आपली प्रकृती एकदम चांगली असून कुणीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी नमूद केले आहे.

जळगाव शहरात कोविड टास्क फोर्सची स्थापना

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात वाढती कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव यांनी कोविड फ्री महाराष्ट्र टास्क फोर्स ची स्थापना केली आहे.

सदर टास्क फोर्सच्या माध्यमाने कोरोना महामारी मध्ये आवश्यक असलेली औषधींच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणे, शहराच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले बेडची संख्या व विविध सुविधाची माहिती जनतेला कळविणे तसेच रुग्णांना आकारण्यात येणारे अवाजवी बिलावर लक्ष ठेवणे व ते शासनाने ठरविल्याप्रमाणे आकारण्यासाठी पाठपुरावा करणे कोरोना रुग्णांसाठी शासनाची विविध योजनांची लाभ जनतेला मिळवून देणे, सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये असलेले रुग्णांची विविध समस्यांचे निराकरण करणे तसेच गरजू रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या हेल्पलाइन नंबर सुद्धा जारी करण्यात येणार आहे.

सदर टास्क फोर्स मध्ये सोहेल अमीर साहब, वसीम शेख साहेब, सुफियान शेख, सद्दाम पटेल, यासिर असीम, नोमान खान, रफिक खान सर, शारिक शेख, तन्वीर शेख, रेहान खाटीक, युसुफ मनियार, अबरार खाटीक इत्यादी लोक शामिल आहे तसेच आरिफ देशमुख साहेब हे सदर कोविड टास्क फोर्सचे समन्वयेक म्हणून काम पाहतील. अशी माहिती शहर अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव यांनी एका प्रेस नोटमध्ये दिली आहे.

पाचोऱ्याचे नगरसेवक विकास पाटलांनी घेतली कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट

0
pachora

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । आजच्या परिस्थितीत सगळीकडे कोरोना सारख्या गंभीर आजाराने थैमान घातले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून याबद्दल बरेचसे गैरसमज पसरले असल्याने ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशा काही व्यक्तींच्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांनी कोरोनाग्रस्त नातेवाईकांना दवाखान्यात दाखल करतांना आपली ओळख देतांना खोटे नाव व भ्रमणध्वनी देऊन त्यांच्या पासून दुर पळाले तर काही ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या अंत्यविधी करिता हजर न रहाता पाठ फिरवली. परंतु समाजात अजुनही चांगल्या लोकांची कमी नाही.

कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही हजारो समाजसेवक, समाजसुधारक लोकांनी स्वत:च्या कुटुंबाची व स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोना बाधीतांना मदत करण्यासाठी वाहून घेत कोरोनाबाधीतांना योग्य उपचार मिळवून देत गरजूंना रक्त, प्लाझ्मा, ऑक्सिजन, अल्पदरात रेमडेसिवीर इंजेक्शन व औषधी मिळवून देत डॉक्टरांना भेटून वाजवी बिलात उपचार मिळवून मानसिक आधार देत हजारो कोरोना बाधीतांना जीवदान देऊन घरी सुखरूप परत पाठवले. असेच एक सर्व परिचित असलेले व कोरोनाच्या कालावधीत धाऊन जाणारे पाचोरा नगरीचा नगरसेवक व नवजीवन विद्यालयात विद्यादानाचे काम करत असलेले विकास पाटील नावाचे अवलिया समाजसेवक पाचोरा शहरातील परिसरात नव्हे तर पाचोरा – भडगाव तालुक्यातील जनतेची सेवा करतांना दिसून येत आहे.

आजपर्यंत विकास पाटील यांनी गरजु रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्यापासून तर प्रत्येक कोविड सेंटरला जाऊन कोरोना बाधीतांची भेटी घेत गरजवंताला रक्तपुरवठा, प्लाझ्मा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, सोबतच लागणाऱ्या औषधी योग्य दरात तर शक्य होईल तितक्या प्रमाणात स्वखर्चाने पुरवून तसेच जेवणाची व्यवस्था करण्यापर्यंत मदत करत आहेत. या त्यांच्या कार्याची तालुक्यातच नव्हे तर जिल्हा पातळीवर जोरदार चर्चा सुरु असून त्यांचे कौतुक होतांना दिसत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईक तर त्यांना देवदूत मानत आहेत. यामागे कारणही तसेच आहे विकास पाटील हे रुग्णांना मदत करत आहेतच परंतु मागे लागु करण्यात आलेल्या कडकडीत लॉकडाऊनच्या काळात जवळपास ६०० कुटूंबियांना किराणा मालाचे किट घरपोच दिले होते. तसेच ९ हजार मास्कचे वाटप केले. प्रत्येक गल्लीत निर्जंतुकीकरण केले होते. तसेच पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेचे मदतीसाठी बरेचसे फोन येतात अशा गरजूंना विकास पाटील हे शक्य होईल तेवढी मदत रात्रंदिवस करत असतात.

मनमिळाऊ व शांत स्वभाव, समाजसेवेची ओढ, योग्यवेळी योग्य मार्गदर्शन व कोरोनासारख्या संकटातही जीवाची पर्वा न करता गरजूंना मदत मिळवून देत असल्याने आजतरी पाचोरा तालुक्यासह जिल्हाभरात विकास पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

नागरीकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार, 3 मे, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे होणार आहे. या लोकशाही दिनात नागरीकांना तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात वेळेतवर उपस्थित रहावे. असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

जामनेरातील आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या क्लबवर धाड ; १३ जण ताब्यात

0
jamner ipl news

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जामनेर शहरातील श्रीराम नगर भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या क्लबवर बुधवारी रात्री जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरु होते.

गेल्या काही दिवसांपासून श्रीराम नगरमध्ये रहिवासी भागात अवैधरीत्या आयपीएलवर सट्टा घेतला जात होता. याची कुणकुण एलसीबीला लागल्याने त्यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. पोलीसांची धाड पडताच परिसरातील नागरीक मोठ्या संखेने जमा झाले. पोलीसांनी घराला चारही बाजूंनी वेढा घालून समोरील दरवाजाने प्रवेश करुन सर्वांना ताब्यात घेतले.

पोलीसाांनी घरातून संगणक, लॅपटॉप, आठ दुचाकी, टिव्ही स्क्रिनसह ५० हजार रोख जप्त केले. एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक स्ववप्नील नाईक व जामनेरचे पोलीस निरीक्षक प्ररताप इंगळे यांनी सहकाऱ्यांसोबत कारवाई केली.