जामनेरातील आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या क्लबवर धाड ; १३ जण ताब्यात

एप्रिल 29, 2021 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जामनेर शहरातील श्रीराम नगर भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या क्लबवर बुधवारी रात्री जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरु होते.

jamner ipl news

गेल्या काही दिवसांपासून श्रीराम नगरमध्ये रहिवासी भागात अवैधरीत्या आयपीएलवर सट्टा घेतला जात होता. याची कुणकुण एलसीबीला लागल्याने त्यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. पोलीसांची धाड पडताच परिसरातील नागरीक मोठ्या संखेने जमा झाले. पोलीसांनी घराला चारही बाजूंनी वेढा घालून समोरील दरवाजाने प्रवेश करुन सर्वांना ताब्यात घेतले.

पोलीसाांनी घरातून संगणक, लॅपटॉप, आठ दुचाकी, टिव्ही स्क्रिनसह ५० हजार रोख जप्त केले. एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक स्ववप्नील नाईक व जामनेरचे पोलीस निरीक्षक प्ररताप इंगळे यांनी सहकाऱ्यांसोबत कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now