⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

भुसावळातील १९ वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील चांदमारी चाळ भागातील 19 वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी उघडकीस आली. पूजा दीपक आव्हाड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

पूजा आव्हाड या तरुणीने राहत्या घरी ओढणीने छतास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात सतीश रामराव आव्हाड यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत. दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

गिरीश महाजनांच्या ‘त्या’ आरोपावर खडसेंचे सडेतोड प्रत्युत्तर

0
eknath khadse girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’ची तारीख आल्यावरच कोरोना कसा होतो ? असा आरोप भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. दरम्यान, महाजनांनी केलेल्या आरोपावर एकनाथराव खडसेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याने गिरीश भाऊंना जो झटका बसला त्यामुळे त्यांना ‘ईडी’ आठवण आता येवू लागली आहे. आणि ‘ईडी लावून छळण्याचा प्रकार कोण करतात, हे सर्व जगाला माहिती आहे, असे शब्दात खडसेंनी गिरीश महाजनांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. विस दिवसापासून कोरोना झाल्यामुळे मी बाँम्बे हाॅस्पीटमध्ये कोरोनाचा उपचार घेत होतो. मला खुप त्रास झाला आणि मला जाणीव आहे कोरोनामध्ये किती त्रास होतो. त्यामुळे मला काही नौटंकी करण्याची सवय नाही, असे खडसे म्हणाले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतील तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार पहिला सोमवार 5 एप्रिल रोजी पाचोरा, पहिला मंगळवार 6 एप्रिल  2021 रोजी  अमळनेर,  पहिला बुधवार 7 एप्रिल रोजी सावदा,  दुसरा सोमवार  12 एप्रिल रोजी चोपडा,  तिसरा सोमवार 19  एप्रिल रोजी यावल, तिसरा गुरुवार 15 एप्रिल रोजी जामनेर, दुसरा व पाचवा गुरुवार 8 व 29 एप्रिल रोजी भुसावळ, तिसरा मंगळवार  20  एप्रिल रोजी धरणगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

चौथा सोमवार 26 एप्रिल रोजी भडगाव, चौथा मंगळवार 27 एप्रिल रोजी बोदवड, चौथा बुधवार 28 एप्रिल रोजी मुक्ताईनगर, चौथा गुरुवार 22 एप्रिल रोजी रावेर,  चौथा शुक्रवार 23 एप्रिल रोजी पारोळा, आणि   दुसरा, तिसरा, पाचवा शुक्रवार  9, 16 व 30  एप्रिल रोजी चाळीसगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द समजण्यात येईल. सर्व संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले  आहे.

ऑल इंडिया बार कॉन्सिलची परीक्षा ऍड देवकांत पाटील पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

0
devkant patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या ऑल इंडिया बार कॉन्सिलच्या परीक्षेत  ऍड देवकांत बाजीराव पाटील हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती. त्यांच्या या यशाबद्दल यावल बार संघाचे अध्यक्ष ऍड वी.एम. परतणे, यावल बार संघाचे सचिव ऍड धीरज चौधरी व सर्व वकील सहकार्यानी व यावल तालुक्यातून व परिसरातून सर्वच स्थरातून  अभिनंदन करून भावी वाटचाली साठी शुभेच्या दिल्यात.

शिरसोली रस्त्यावर मालवाहू ट्रक उलटला; एक महिला जखमी

0
accident

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । शहाराकडून शिरसोलीकडे जात असलेला मालवाहू ट्रक क्रमांक एमएच.०४.पी.८७३६ हा हॉटेल आमंत्रणजवळ वळणावर उलटला. अपघातात एक महिला जखमी झाली असून तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नसून एमआयडीसी पोलीस तपास करीत आहे.

रावेर आयटा युनिटतर्फे वार्षिक सभा संपन्न ; अध्यक्षपदी शरीफ शेख तर सचिवपदी सलमान अली

0
raver news

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । ऑल इंडिया आयडीयल टिचर असोसिएशन रावेर यांची २९ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन मिटीग संपन्न झाली. या मिटींग मध्ये नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांची सर्वनुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठनांने करण्यात आली. ऑल इंडिया आयडीयल टिचर असोसिएशन चे उद्दीष्ट जमात-ए-इस्लामी हिंद चे अध्यक्ष  शफीउद्दीन सर यांनी सांगीतले. तसेच कार्यक्रमाची  प्रस्तावना शफीक शेख यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या सहमती ने शरीफ शेख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर  सचिवपदी सलमान अली फायनान्स सेक्रेटरी मलक युनुस व मिडिया सेक्रेटरी सैय्यद मुजाहिद यांची निवड करण्यात आली.

या वेळी ऑनलाईन मिटींग मध्ये शफीयोद्दीन सर, ताबीस शेख, अमीन शेख, अय्युब खान, मलक अनीस, सादीक शेख, फरहान अहेमद, मतीन अहेमद, मोहसीन खान, लारेब खान आदी उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरीफ शेख यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली.

कोण म्हणतंय तरुणांना कोरोनाचा त्रास होत नाहीये? जळगावात गेल्या ३० दिवसात १६ तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू

0
corona patinet

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगावात कोरोनाची लक्षण असून अंगावर काढण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे. यामुळे पहिल्या ७२ तासातच ७५% रुग्णांचा मृत्यू होत आहे.लक्षण दिसून देखील मी वय कमी आहे तर काही होणार नाही असा अभिर्भाव अनेकांचा दिसून येत आहे. परंतु समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा दावा खोटा ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील ३० दिवसात १६ तरुणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ४० वर्षांआतील व्यक्तींच्या संख्येत अचानक झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या ३० दिवसांत अशा १६ रुणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तरुणांमध्ये कोरोना संसर्गाबाबत असणाऱ्या बेफिकिरीमुळे हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. कोरोनाने जिल्ह्यातील १६११ नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यात ४० वर्षांच्या आत वय असलेले ७३ जण आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण पहिल्या लाटेच्या ११ महिन्यांत मरण पावले. मार्च २०२१च्या अवघ्या ३० दिवसांतच अशा कमी वयाच्या तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्च महिन्याच्या ३० दिवसांत २२६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यात १६ जण हे ४० वर्षांआतील होते. एक तर दोन वर्षांचीच बालिका होती. ८ मार्चला २२ आणि ३६ वर्षीय तरुण, ९ मार्चला ४० वर्षीय महिला, १२ मार्चला ३० वर्षीय तरुण, १९ मार्चला ४० वर्षीय महिला, २० मार्चला ३८ वर्षीय पुरुष, २४ मार्चला २० वर्षीय तरुणी आणि ३५ वर्षीय तरुण, २५ मार्चला ३५ वर्षीय तरुण, २६ तारखेला पुन्हा ३५ वर्षीय तरुण, २७ मार्चला २८ वर्षीय महिला, २८ मार्चला दोन वर्षीय बालिका आणि ३३ वर्षीय तरुण, २९ मार्चला ४० वर्षीय इसम आणि ३० मार्च राेजी ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती आजच्या दैनिक दिव्यमराठीमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

BHR Scam: कोथरूड पोलीस जळगावात दाखल; दोघांना होणार अटक?

0
bhr incumbent chaitanya nasare will take charge today

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगावमधील बहुचर्चित BHR Scam बीएचआर घोटाळा प्रकरण अनेक कारणांमुळे गाजत आहे. आज सकाळी ७ वाजता कोथरूड पोलीस जळगावात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तसेच आज या प्रकरणात दोघांना अटक होणार असल्याचे देखील कळते.

आज या प्रकारात पुढील तपासासाठी आणि दोघांच्या अटकेसाठी कोथरूड पोलीस जळगावात सकाळी ७ वाजताच दाखल झाले आहेत. आज सकाळ पासून सोशल मीडियात फिरत असेल्या मेसेजमुळे अटक होणारे दोघे मविप्रशी संबंधित असल्याचे कळते. येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांभवतीचे फास आवळला जाण्याची शक्यता असून अनेक जण ‘संकटात’ येणार आहे.

bhr whatsapp post

येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांभवतीचे फास आवळण्याचा शक्यता आहे.बीएचआर घोटाळा प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे न्यायालयात पाच संशयितांविरुद्ध २५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करत ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजित वाणी या पाच जणांविरुद्ध दोषारोप सादर ठेवण्यात आले आहेत. यातील कमलाकर कोळी हा जामिनावर मुक्त आहे तर इतर चारही जण सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

 

जळगावकरांनो आजार अंगावर काढू नका… ७५ टक्के रुग्ण पहिल्या ७२ तासातच मृत्यू पडताय…

0
corona patient

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप घेत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जळगावला चांगलाच तडाखा दिला आहे. मागील कोरोनापेक्षा यावेळी कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दिव्या मराठीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये ७५% म्हणजे सर्वाधिक मृत्यू हे दाखल झाल्यानंतर ७२ तासांच्या आत झालेले आहेत.

अनेक रुग्ण कोरोनाचे लक्षण दिसून देखील आजारपण अंगावर कढत आहेत. अनेकदा प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यानंतर हे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहे. यामुळे त्यांच्यावर उपचार होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात दिवसाला जवळपास १० ते १५ मृत्यू कोरोनामुळे होत आहेत.

सर्वाधिक ७२ तासांच्या आत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या ७५ टक्के आहे. दाखल झाल्यानंतर ६ तासांत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ११ टक्के आहे तर २४ तासांत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या २० टक्के आहे. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर रुग्ण दाखल होत असल्याने त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नाहीये. यामुळे अंगावर आजारकाढू नका, लक्षण दिसतच उपचार सुरु करा असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले आहे.