⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024

जळगाव जिल्ह्यात ३१ मार्च ते १५ एप्रिल विशेष निर्बंध ! पहा… काय सुरू आणि काय असणार बंद

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जळगाव शहरासह जिल्ह्यात तीन दिवस लावण्यात आलेला लॉकडाऊन दि.३० रोजी मध्यरात्री संपणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी दि.३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंध लागू केले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशात काही बाबी सुरू राहणार असून त्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले आहे.

 पहा… काय सुरू आणि काय असणार बंद

1) जळगांव जिहयातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

2) भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील आणि एका आड एक याप्रमाणे ओटे सुरु राहतील याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने घ्यावी.

3) जळगाव जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता, सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करणे, सर्व व्यक्तीनी चेहर्यावर मास्क लावण, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसंच सॅनिटायझररचा वापर करणे व हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहील, सदर बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करणार शेतकरी व खरदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असल, सदर ठिकाणी कोणत्याही प्रकार, कोणत्याही रिटेलर्स (किग्काळ व्यापारी) यांना प्रवेश असणार नाही. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव व सर्व सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी संबंधित बाजार समितीच्या ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन काविड-19 नियमावलोचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी.

4) जळगांव जिल्हयातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्रे सकाळी 07.00 ते संध्याकाळी 08.00 वाजेपावेतो सुरु ठेवता येतील.

5) जळगांव जिल्हयातील सर्व Non-Essential दुकाने केवळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतील.

6) हॉटेल /रेस्टॉरंट / परमिट रुम / बार इत्यादी आस्थापना सकाळी 09.00 ते रात्री 08.00 वाजेपावेतो कोविड- 19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के बैठक क्षमतेसह सुरु राहतील. तथापि हॉटेल / रेस्टॉरंट परमिट रुम / बार इत्यादी ठिकाणाहून जेवणासाठी केवळ होम डिलीव्हरी, पार्सल या माध्यमातून सकाळी 09.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत सेवा देता येईल. या बाबींचे उल्लंघन झाल्यास हॉटेल / रेस्टॉरेंट हे कोविड-19 महामारी बावत अधिसूचना अस्तित्वात असे पर्यंत बंद ठेवण्यात येतील तसेच दंडात्मक कारवाईस पात्र राहतील.

7) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व कोचिंग क्लासेस बंद राहतील. तथापि विद्याथ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित रहावे. तथापि इयत्ता 10 वी व 12 वी बाबतीत पालकांचे संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील.

8) अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ 50 % क्षमतेच्या मर्यादेत कोविड -19 नियमावलीचे पालन करुन सुरु ठेवता येतील.

9) सर्व सिनेमागृहे, मॉल, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहतील. तथापि याबाबींचे उल्लंघन करणा-या प्रति व्यक्तीकडून रुपये 10,000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल.

10)सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील.

11) जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टैंक हे राज्यस्तरीय / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील तथापि सामूहिक स्पर्धा /कार्यक्रम बंद राहतील.

12) सर्व प्रकारचे सामाजिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सव, समारंभ, यात्रा, दिंड्या, ऊरुस व तत्सम धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंदच राहतील. तसेच सभागृहे / ड्रामा थिएटरर्स देखील बंदच राहतील.

13) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ 05 लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरिता खुली राहतील

14) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल.

15) लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजनिक मोकळया ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.

16) लग्न समारंभ व इतर समारंभ हे केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलीचे पालन करुन शास्त्रोक्त/वेदीक पध्दतीने अथवा नोंदणीकृत विवाह पध्दतीने साजरा करण्यात यावेत.

17) कायद्यान्दारे बंधनकारक असणाऱ्या वेधानिक सभांना केवळ 50 लोकांचे उपस्थितीच्या मर्यादित परवानगी राहील. (तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहोल. शक्य झाल्यास अशा प्रकारच्या सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात.

18)गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रैली यांना बंदी राहील, मात्र केवळ 5 लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल.

19) सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 चे मागदर्शक सूचनांचे पालन करणेबाबत जनजागृती करावी.

20) तसेच कोविड-19 बाबतीत शासनाचे मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे , हंड सॅनिटायझरचा वापर करणे इ. बंधनकारक राहील.

21) सर्व खाजगी आस्थापना / कार्यालये हे एकूण कर्मचारी क्षमतेच्या 50% क्षमतेसह सुरु राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोविड-19 ची लक्षणे दिसून येणा-या संशयित कर्मचा-यांची कोविड-19 RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.

22)शासन आदेश दिनांक 15 मार्च, 2021 अन्वये सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) 50% कर्मचारी यांच्या उपस्थितीतीबाबत कार्यालय प्रमुख यांनी कोविड-19 प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावा.

23) सर्व शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणा-या अभ्यागतांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी, अतिमहत्वाच्या कामाशिवाय अभ्यांगतांना शासकीय कार्यालयात प्रवेश असणार नाही. तसेच ज्या अभ्यांगतांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले असेल त्या संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी अशा व्यक्तींना प्रवेशपास दिल्यानंतरच प्रवेश देण्यात यावा.

24) गृह विलगीकरण (Home Isolation) करण्याबाबत या कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक दंडप्र-01/कावि 2020/ 604, दिनांक 12 मार्च, 2021 अन्वये आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका जळगांव व उपविभागीय दंडाधिकारी सर्व यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

25) विनामास्क आढळून येणा-या व्यक्तींना रु 500/- मात्र दंड आकारण्यात येईल, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तींना रु 1000/- मात्र व गर्दी करणा-या प्रति व्यक्तीना रुपये 1000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल.

26) संपूर्ण जळगांव जिलयात रात्री 10.00 वाजेपासून ते सकाळी 07.00 वाजेपावेतो संचारबंदी (Night Curfew) घोषित करण्यात येत असून 05 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. याबावत उल्लंघन करणा-या प्रति व्यक्तीकडून रुपये 1,000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल.

वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फोजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

दुष्काळात तेरावा महिना ; २ एकर मका जळून खाक

0
dharangaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । धरणगाव शिवारातील शेतमालक सुकलाल गंगाराम माळी यांच्या शेतात आज दि. ३० मार्च रोजी दु. ३ वाजेच्या सुमारास धरणगाव – सोनवद रस्त्याला लागून असलेल्या शेतात इलेक्ट्रिक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत २ एकर मका भुट्ठा चारासह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन एकराच्या परिसरामध्ये सुकलाल गंगाराम माळी नामक शेतकऱ्यांनी मका पिकवला होता. श्री. माळी यांच्या शेताच्या परिसरात अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यामुळे येथे आग लागली आणि शेतातील मका पिकाने अचानकपणे पेट घेतला. लागलेल्या आगिमुळे या सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतातील जमिनीवर निघालेला मका भुट्ठा सह चारा जळाल्याचा आरोप या सर्व शेतकऱ्यांनी केला आहे. या आगीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याने मायबाप सरकारला नुकसान भरपाई मिळावी म्हणून विनंती केली आहे. तसेच, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख यांनी शासन, प्रशासनाला विनंती केली आहे की, आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून त्वरित मदत करण्याचीही मागणी केली आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख भाऊ देशमुख यांनी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाला फोन लावून झालेली घटना सांगितली, त्याच क्षणी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते विनय भावे यांनी तात्काळ फायर फायटर व टँकर घटनास्थळी वेळेवर पाठविले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानाची हानी टळली. व टीमने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या शॉर्टसर्किटमध्ये शेतातील मका जळाला आहे. विशेष म्हणजे शॉर्टसर्किटमुळ पीक जळाल्याची धरणगाव तालुक्यात अनेक घटना घडल्या आहेत.

एरंडोल येथील उमेश महाजन धावले चाळीसगावकरांच्या मदतीला

0
umesh mahajan erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । एरंडोल येथील ‘जय बाबाजी फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष व महात्मा जोतिबा फुले युवा मंचचे युवा प्रदेश अध्यक्ष उमेश अभिमन महाजन हे सातत्याने गरजु रुग्णांना त्यांनी स्थापन केलेल्या जय बाबाजी फाऊंडेशनतर्फे मदत करीत असतात. त्यांच्या या स्तृत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चाळीसगाव येथील दिपक येवले यांच्या अडीच वर्षाच्या मुलाला किडणीचा प्रॉब्लेम उद्भवला. त्यावरील ऑपरेशन व उपचारासाठी तेथील डॉक्टरांनी त्यांना साधारण २ लाख रुपये खर्च सांगितला होता. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे या कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. अश्या वेळी येवले यांना नाशिक येथील जय बाबाजी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व महात्मा जोतिबा फुले युवा मंचचे युवा प्रदेशाध्यक्ष उमेश अभिमन महाजन यांचा परिचय मिळाला. तेव्हा त्यांच्याशी संपर्क केल्यावर उमेश महाजन देवदूतासारखे हजर राहून त्यांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून व आपल्या फाऊंडेशनच्या मदतीने येवले यांच्या मुलाचे ऑपरेशन मोफत घडवून आणले. त्या वेळी दुःखात असलेल्या येवले कुटुंबियात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी युवा प्रदेश अध्यक्ष उमेश महाजन व जय बाबाजी फाऊंडेशन चे आभार मानले.

जळगाव एमआयएम जिल्हाध्यक्षपदी ऍड.इम्रान हुसैन यांच्या नावाची चर्चा

0
advocate imran hussain

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । शहर मनपा महापौर पदाच्या निवडणूकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याकारणाने पक्ष प्रमुखांनी जळगाव येथील एमआयएमच्या ३ नगरसेवकांना व जिल्हाअध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नगरसेवकांवर निलंबनाची तात्पुरती कारवाई केल्यानंतर जिल्हाध्यक्षांना पदावरून हटविण्यात आल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्हाध्यक्ष पदासाठी ऍड.इम्रान हुसैन यांच्या नावाची चर्चा आहे.

एमआयएमच्या चारही पदाधिकाऱ्यांनी नोटिसला उत्तर देत औरंगाबाद येथे दि.२१ रोजी प्रत्यक्षात आपले म्हणणे मांडले होते. या सर्व घडामोडीमध्ये एमआयएम जिल्हाध्यक्ष जिया बागवान यांना पदावरून हटविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून त्यांच्या जागी जिल्हाअध्यक्ष पदासाठी अँडव्होकेट इम्रान हुसैन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसात पक्षश्रेष्ठी यावर आपला निर्णय जाहीर करतील.

आज जळगाव जिल्ह्यात ११९१ नवीन कोरोना रुग्ण; गेल्या २४ तासात १४ जणांचा मृत्यू

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लावून देखील जिल्ह्यातील कोरोनाचा विस्‍फोट सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल ११९१ नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८७ हजार ८७९ झाली आहे. त्यात एकूण ७४ हजार ५९४ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे.

असे आढळले रुग्ण :

जळगाव शहर १७१, जळगाव तालुका ४७; भुसावळ १९३, अमळनेर- १२०; चोपडा- २३३; पाचोरा ४१; भडगाव ४८; धरणगाव ४८; यावल २४; एरंडोल ६५,  जामनेर ४६; रावेर २६, पारोळा २०; चाळीसगाव ५६; मुक्ताईनगर ३१; बोदवड-२० आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे ११९१ रूग्ण आढळून आले आहेत.

पातोंडा “क्लस्टर”मुळे होणार परिसराचा कायापालट ; खा.उन्मेश पाटील यांची माहिती

0
unmesh patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । केंद्र सरकारने शामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन अभियानांतर्गत पातोंडा, न्हावे-ढोमणे, टेकवाडे, बहाळ या परिसरात विविध कामांना मंजुरी दिली असून आज साडे बारा कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी प्राप्त झाला आहे. या अंतर्गत  55  विविध कामे या परिसरात होणार असून यात प्रामुख्याने अंतर्गत गटारी,गावांतर्गत रस्ते जोडणी, स्मशानभूमींची सुधारणा, गाव हाळ तयार करणे, ग्रेडिंग पॅकिंग शेड बांधणे, शीतगृहाची निर्मिती करणे, पशुवैद्यकीय दवाखाना सुधारणा त्यांना वॉल कंपाउंड करणे. बाजार ओटे बांधणे, बहुउद्देशीय हॉल बांधणे, अंगणवाडी सुधारणा त्यांना वॉल कंपाऊंड करणे, शालेय इमारत दुरुस्ती ,विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करणे साहित्य खरेदी जिमखाना तयार करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट बसविणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे इमारती सुधारणा या सर्व विविध पंचावन्न विकास कामांचा सुरूवात केली जाणार असून आज या गावांच्या सरपंच उपसरपंच पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असून पातोंडा,

न्हावे-ढोमणे,टेकवाडे, बहाळ येथील नियोजित पातोंडा “क्लस्टर” मुळे होणार परिसराचा कायापालट होणार असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज खासदार जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा वाजता उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळके, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, पातोंडा सरपंच बापू महाजन, उपसरपंच दिपक देसले पाटील, बहाळ सरपंच राजेंद्र मोरे , उपसरपंच प्रमोद आण्णा पाटील, टेकवाडे सरपंच वाल्मिक दादा पाटील, टेकवाडे उपसरपंच राजू भिल्ल, न्हावे ढोमणे सरपंच किशोर पाटील ढोमणेकर,उपसरपंच दिपक पाटील, पातोंडा ग्रामसेवक एस. पी. मोरे, टेकवाडे ग्रामसेवक महाले, न्हावे ग्रामसेवक हिरामण पाटील, बहाळ ग्रामसेवक सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला गटविकास अधिकारी नंदकुमार वाळके यांनी या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने घालून दिली असून राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने दिलेल्या डीपीआर नुसार या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. अतिशय गुणवत्तापूर्वक ही कामे होणार असून यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व यंत्रणेने ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे. अशी अपेक्षा बि.डि.ओ. नंदकुमार वाळके यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केली.

सरपंच उपसरपंच यांनी मानले खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आभार 

यावेळी आपली भावना व्यक्त करतांना पातोंडा सरपंच बापू महाजन यांनी विकास कामामुळे आमच्या गावाचा वैभवात भर पडणार असून ही कामे दर्जेदार व्हावीत. यासाठी आम्ही गावकरी जागरूक राहू. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून या सुविधा निर्माण झाल्यानंतर आम्ही शहरांशी स्पर्धा करू ही विकासाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे जाहीर आभार मानतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

परिसराचा चौफेर विकास होणार 

खासदार उन्मेश पाटील पुढे की म्हणाले की केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन अंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गावांच्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवायच्या असल्याने यामध्ये कृषी आणि कृषी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे आज सुमारे 97 कोटी रुपयांच्या कामांपैकी 12 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या गावांचा परिसराचा चौफेर विकास होणार आहे. अशी माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

चितोडा येथील ‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत ; परिसरात खळबळ

0
yaval

चितोडा, ता.यावल : गेल्या चार ते पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवराज काशिनाथ कोलते (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सदर तरुण हा शुक्रवार (दि.२६) रोजी दवाखान्यात जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळ होऊनही युवराज हा घरी परतला नाही. गेल्या दोन दिवसापासून त्याचा शोध घेतला तरी देखील मिळून आला नाही. मात्र, आज गावाशेजारील देविदास पाटील यांच्या शेतातील विहिरीत युवराज कोलते याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकलेले नाही. परंतु मागील काही दिवसापासून तो वेडपणा सारख करीत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तायडे यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार नेताजी वंजारी हे करीत आहे.

मुस्लिम मनियार बिरादरीच्या पुढाकाराने ७४९ रुपयात रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध

0
covid 19 drug remdesivir

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत अकोला येथील दत्त मेडिकल जर ७५० रूपयांना इंजेक्शन देत असेल तर जळगावला का मिळू शकत नाही ? हा विषय चर्चिला जात होता.

सदर बाबत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम १०५०/ रुपयात उपलब्ध करून दिला असल्याने त्यांनी या चर्चेत जळगावातील आपल्या मित्र परिवार व मुंबई येथील मित्र परिवार यांच्या सहकार्याने जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन हे ७४९/- रुपयात उपलब्ध करून दिले व आज मंगळवारी सदरचे इंजेक्शन जळगावातल्या के परविन मेडिकल स्टोरमध्ये विक्रीला उपलब्ध केले आहे.

सदर चे इंजेक्शन घेणे साठी मेडिकल स्टोअर ला कुपन दिल्यावरच त्यांना इंजेक्शन मिळणार आहे. जे रुग्ण अगदी गरीब असून रेमडेसिव्हर चा खर्च उचलू शकत नाही त्यांना संपूर्ण ६ इंजेकशन मोफत देण्यात येईल असे सुद्धा फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिलेले आहे.

सिटी स्कॅन व रक्त तपासणी साठी विशेष सूट

बिरादरी ने यापूर्वी एच आर सिटी तपासणी सुद्धा फक्त १८००/- रुपयात व सम्पूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त १३००/- रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे.

जळगाव मुस्लिम मनियार बिरादरी च्या कोविड रुग्णा साठी महाराष्ट्रात जळगाव मानियार पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे. अधिक माहिती साठी संपर्कासाठी ९४२३१८५७८६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

remdesivir injection

महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आ.मंगेश चव्हाण यांची कारागृहात रवानगी

0
mangesh chavan

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । महावितरण अधिक्षक अभियंत्यांना खूर्चीत बांधून मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांची आज नाशिक कारागृहात रवानगी केली आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी २६ मार्च रोजी महावितरणच्या कार्यालयात आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांना जमाव गेला होता. यावेळी आमदारांसह जमावातील शेतकऱ्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. चपलांचा हार घातला. या प्रकरणी फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली.

जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.