⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024

वादळाचा फटका ; भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आ.पाटलांच्या सूचना

0
bhadgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । भडगाव तालुक्यात काल वादळामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याअनुशंगाने आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व कृषी  अधिकाऱ्यांना नुकसानीचा पंचानामा करण्याच्या सुचना दिल्या. 

मंगळवार रात्री भडगाव तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले. त्यात अंतिम टप्प्यात आलेला रब्बी हंगाम अक्षरश: आडवा पडला. ज्वारी, मका,गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. तर काही भागात फळ पिकांचे झाडे उन्मळून पडले.  त्यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी आढावा घेत तत्काळ प्रातांधिकारी राजेंद्र कचरे यांना पिकांच्या नुसनाची पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. तालुका कृषी अधिकार्याना त्यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये असे त्यांनी सांगीतले. त्यानुसार आज सकाळीच तहसिलदार सागर ढवळे, कृषी अधिकारी बी. बी. गोरर्डे यांनी शेतकर्याच्या शेतात जाऊन पंचनाम्याना सुरवात केली.

आमदार सुपुत्र सुमीत पाटलांनी केली नुकसानीची पाहणी

दरम्यान आमदार किशोर पाटील हे मुबंईत असल्याने त्यांचे पुत्र  सुमीत पाटील यांनी भडगांव तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सागर ढवळे, कृषी मंडळधिकारी थोरात आदि उपस्थित होते. नुकसान स्थीती सुमीत पाटील आमदार किशोर पाटील यांना सांगीतली. तर अधिकार्याना प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकर्याचा वस्तुनिष्ठ पंचानामा करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्ह्यात कोरोनाचा विस्‍फोट ; १२२३ नवे बाधित रुग्ण, मृत्‍यूचा आकडाही वाढताच

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा विस्‍फोट सुरू आहे. आज दिवसभरात तब्बल १२२३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर तर जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणारे मृत्‍यूचे तांडव देखील कमी होत नसल्‍याचे चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत १३ जणांचा बळी गेला. हे दोन्ही आकडे या टप्प्यातील विक्रमी व धडकी भरविणारे आहेत.

जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा वाढता आलेख चिंता वाढविणारा आहे. साधारण महिनाभरापासून संसर्ग वाढताच आहे. सातत्‍याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्‍हाच आता हॉटस्‍पॉट बनला आहे. यातही जळगाव शहरासह चोपडा, अमळनेर आणि भुसावळ तालुक्‍यात परिस्‍थिती अधिक गंभीर बनलेली आहे. यामुळे नागरीकांनी काळजी घेणेच कोरोना रोखण्यास मदत करणार आहे.  

आज दिवसभरात ९०८ रूग्‍ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण ६८ हजार ९८१ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ८० हजार ७८६ झाली आहे. महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्‍थितीत १० हजार २७९ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्यांचा आकडा देखील कमी होत नाही. जिल्ह्यात आज देखील १3 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५२६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २४८, जळगाव तालुका-१३; भुसावळ 135, अमळनेर-१५३; चोपडा-३३८; पाचोरा-०३; भडगाव-३०; धरणगाव-३१; यावल-४५; एरंडोल-२९; जामनेर-६५; पारोळा-३४; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर-२९; बोदवड-२७ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे १२२३ रूग्ण आढळून आले आहेत.

अवैध गौण खनिज वाहतुक तात्काळ थांबवण्यासाठी एकलव्य संघटनेचे आमरण उपोषण

0
ekalavya sanghatana

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या व पाचोरा शहरातील अवैध वाळू साठा करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या व मनमानी कारभार करणाऱ्या पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांचेवर निलंबनाची कारवाई करणेबाबत एकलव्य संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली आमरण उपोषणाला उपोषण सुरू केले आहे. 

एकलव्य संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, परधाडे हद्दीतील गिरणा नदी पात्रातील संबंधीत ठेकेदार विनापरवानगी अवैध वाळू दररोज २०० ते ४०० ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याबाबत आपल्याला लेखी निवेदन दिलेले आहे. तसेच ९ मार्च रोजी मौजे ग्रा.पं. परधाडे यांनीदेखील लेखी तक्रार दिलेली आहे. तसेच १ मार्च रोजी ग्रा.पं. सरपंच व सदस्यांनी आपल्याशी मोबाईलवरुन संपर्क साधुन आमच्या हद्दीतुन वाळू उचलली जात असलेबाबत तक्रार केल्यामुळे आपण आपले तलाठी व सर्कल यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले होते. परंतू तलाठी, सर्कल यांनी पंचनामा करुन गेल्यावर देखील संबंधीत ठेकेदाराने परधाडे हद्दीतुन वाळू उपसा बंद केलेला नाही. म्हणून एकलव्य संघटनेने दि.१२ मार्च रोजी आंदोलनाचा इशारा

दिल्यावर १२ मार्च रोजी तहसिलदार यांनी परधाडे येथे गिरणा नदीतुन परधाडे हद्दीतील वाळू उपसा होत आहे. म्हणून संबंधीत अधिकारी तलाठी व सर्कल यांना हद्द मोजण्यासाठी पाठविले होते. संबंधीत अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची मोजमाप न करता संबंधीत ठेकेदाराच्या पोकल्यांड ने गिरणा नदी पात्रातील एरंडोल तहसिलदारांनी उत्राण हद्दीतील वाळू गटाच्या हद्दीत लाल झेंडे गाडण्यात आलेले होते. ते झेंडे संबंधीत ठेकेदारांनी काढुन परधाडे हद्दीत वाळू उपसा सुरु केला होता. परंतू एरंडोल तहसिलदारांनी ठेकेदाराला आखुन दिलेल्या लाल झेंड्याच्याही पुढे परधाडे हद्दीत पोकल्यांडच्या सहाय्याने गिरणा नदीच्या सेंटरला चारी पाडून दिली. परंतू ठेकेदाराने उपसा केलेल्या वाळूची कोणत्याही प्रकारची हद्दीची व वाळूची बांधकाम विभागाच्या साहाय्याने मोजणी न करता ठेकेदाराच्या बाजुने निर्णय दिल्याबद्दल पाचोरा

तहसिलदार हे संबंधीत ठेकेदाराशी लागेबांधे आहे. असे दिसुन येते. मौजे उत्राण व मौजे परधाडे गिरणा नदीतील सर्व वाळू पाचोरा शहरात रोज शेकडो वाहने जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयाकडून प्रमाणीत करण्यात आलेल्या वाळू वाहतुक परवान्यावर पावतीवर महामायनींग प्रणालीव्दारे प्राप्त झालेल्या इनव्हाईस नंबर, दिनांक, वेळ नोंदवलेली नसते तरीसुध्दा त्या वाहनांवर कार्यवाही करतांना तहसिलदार  दिसत नाही. त्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुकीस आळा घालून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.यासाठी एकलव्य संघटनेतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, १ मार्च रोजी सर्कल, तलाठी यांनी गिरणा नदीत जाऊन परधाडे हद्दीत चुकीचा व खोटा अहवाल आपल्याकडे सादर केल्यामुळे संबंधीत तलाठी व सर्कल यांचेवर

निलंबनाची कारवाई करण्यात यावी. पाचोरा शहरात सुरु असलेल्या शासकीय व खाजगी ठेकेदारांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्या सर्व बांधकामांवर आजरोजी शहरात ठिकठिकाणी ४० हजार ते ५० हजार ब्रास वाळूचे थप्पे दिसत आहेत. आपण तहसिलदार या नात्याने संबंधीत शासकीय व खाजगी ठेकेदार बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी स्वामीत्व शुल्क न भरलेबाबत आतापर्यंत अवैध गौणखनिज साठा करणेबाबत किती दंडात्मक व फौजदारी कारवाई केल्यात. याची माहिती लेखी स्वरुपात मिळावी. व संबंधीत वाळू साठा करणाऱ्यांवर का कारवाई करण्यात आली नाही, म्हणून त्याची सर्वस्वी जबाबदारी अवैध गौणखनिज आळा न घालण्याबाबत पथक प्रमुख म्हणून तहसिलदार, सर्कल व तलाठी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. या मागणी साठी उपविभागीय कार्यालया समोर एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचे मार्गदर्शनाखाली रमेश ठाकरे, कैलास भिल आमरण उपोषणाला बसले आहेत.

कोरोनाचा कहर, देशातील टॉप 10 शहरांमध्ये जळगावचा समावेश

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही महराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ९ शहरांमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील काही दिवसापासून ११ ते १२ रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढली आहे.

दरम्यान, देशातील 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे
पुणे
नागपूर
मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
नांदेड
जळगाव
अकोला

आम्ही एरियाचे दादा सांगत, अजिंठा चौफुलीवर कुल्फी विक्रेत्याला मारहाण, दगडफेक

0
marhan

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । शहरातील अजिंठा चौफुली येथे हातगाडीवर कुल्फी विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कुल्फीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने चार तरुणांनी कुल्फी विक्रेत्याला आणि एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासमवाडीतील रहिवासी असलेले नयन अनिल भदाणे यांची अजिंठा चौफुली येथे लेटेस्ट मावा कुल्फी नावाची गाडी आहे. बुधवारी दुपारी २.३० वाजता ते नेहमीप्रमाणे आपल्या गाडीवर कुल्फी विक्रीचा व्यवसाय करीत होते. गाडीवर इरफान खान उर्फ इल्लू याच्यासह इतर ३ तरुण कुल्फी खाण्यासाठी आले. कुल्फीचे पैसे मगितल्याचा राग आल्याने आम्ही या एरियाचे दादा आहे, आम्हाला पैसे मागतो का म्हणत चौघांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. चौघांनी नयन याच्यासह त्याचा मावस भाऊ लोकेश अरुण वाणी व मावसा अरुण पांडुरंग वाणी यांच्यावर दगडफेक केली. दगडफेकीत नयन याचे डोके फुटले असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तरुणांकडून मारहाण सुरू असताना लोकेशने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाला पांगवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाची बातमी : चोपड्यातील कर्फ्यु २८ मार्चपर्यंत वाढवला

0
janta farfew (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ ।  चोपडा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा जनता कर्फ्यु लावला होता. परंतु विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जनता कर्फ्युत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर चोपडा तालुक्यात २५ ते २८ मार्चदरम्यान पुन्हा चार दिवसाचा पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. यात दि २५ व २६ रोजी किराणा दुकानांसाठी शिथिलता देण्यात आली आहे.

कोरोनाने महिन्याभरापासून थैमान घातले आहे. त्यावर उतारा म्हणून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांनी जनता कर्फ्युत वाढ केली आहे.याचा परिणाम कोरोनाचा वाढत्या रुग्ण संख्येला पायबंद घालतांना दिसत आहे. पण एवढ्यावर न थांबता प्रशासनाकडून कोरोनाची मगर मिठी सोडविण्यासाठी पुन्हा २५ ते २८ मार्च असे चार दिवसाचा पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. 

काय सुरु काय बंद असणार?

१) सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.

२) किराणे दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील

३) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील.

४) शैक्षणिक संस्था / शाळा / महाविद्यालय, खाजगी कार्यालय बंद राहतील.

५) हॉटेल / रेस्टॉरंट (होम डीलीव्हरी / पार्सल वगळता) बंद राहतील.

६) सभा / मेळावे / बैठका / धार्मिक स्थळे , सांस्कृतिक/ धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

७) शॉपींग मॉल/मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.

८) गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेषकगृहे, क्रिडास्पर्या, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.

९) पानटपरी, हातगाड्या, उधड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.

वरीलप्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून “दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अम्ब्युलन्स सेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत घटक यांना सूट देण्यात आली आहे.

चार दिवसांच्या कर्फ्युत दोन दिवस किराणा दुकानांसाठी शिथिलता

चोपडा प्रशासनाकडून २५ ते २८ मार्च पर्यंत पुन्हा जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. परंतु यात २५ व २६ या दोन दिवसांसाठी किराणा दुकानांना शिथिलता देण्यात आली असून सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

एरंडोलकरांचा कडकडीत बंद

0
erandol janta carfew

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ ।  एरंडोल शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २४ ते २८ मार्च दरम्यान पाच दिवस कडकडीत बंदचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २४ ) बंदचा पहिला दिवस यशस्वी झाल्याचे चित्र आहे. संपूर्ण शहरात कडकडीत बंद दिसून आला. बंदला नागरिक, व्यापारी आदी सर्व घटकांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून पोलिस, पालिका कर्मचारी , होमगार्ड प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्यावर करडी नजर ठेवली होती.

येथे प्रशासनाने आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यु पुकारला. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य केले. एरंडोल येथे कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही शृंखला खंडित व्हावी म्हणून महसूल, पोलीस आणि नगर परिषद, होमगार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारला गेला आहे. जनजागृतीसाठी फ्लॅग मार्चकालच संध्याकाळी संपूर्ण शहरात बुधवार दरवाजा, भगवा चौक,  मारवाडी गल्ली,आर टी काबरे स्कूल मार्गे जनजागृतीपर फ्लॅग मार्च काढून नागरिकांना पाच दिवसांच्या  दुकान उघडे ठेवू नये असे आवाहन केले.

आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण कोणी बाहेर फिरू नये , अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. फ्लॅग मार्चमध्ये  प्रांताधिकारी विनय गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, नगर पालिका चे हितेश जोगी, अनिल महाजन, पोलिस स्टेशन चे कर्मचारी होते.त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाहायला मिळाला.

रेडक्रॉसचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद : महापौर

0
red cross jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । जळगाव शहराच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई महाजन यांनी  सामान्य रूग्णालया मार्फत रेडक्रॉस येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अतिशय शिस्तबध्द नियोजन,  सोशल डीस्टन्सिंचे पालन करून बसण्याची सुविधा, चार रजिस्ट्रेशन टेबल,  अशा सर्व सोयी सुविधांसह दिवसभरात २५० ते ३०० नागरिक या लसीकरणाचा लाभ घेत आहेत. हे सर्व पाहून माननीय महापौर यांनी समाधान व्यक्त केले.

महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी रक्तपेढीला भेट देऊन रक्तपेढीची पाहणी केली. रक्तपेढीत असलेल्या सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाची त्यांनी उत्सुकतेने माहिती करून घेतली.  रक्तपेढीच्या क्षेत्रातील सर्वात सुरक्षित असलेल्या नॅट हे तंत्रज्ञान जळगाव जिल्ह्यात रेडक्रॉसमध्ये असून आरोग्य क्षेत्रात खूप चांगले कार्य रेडक्रॉस रक्तकेंद्रामार्फत होत असल्याने महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी रेडक्रॉसच्या कार्यकारिणी मंडळाचे कौतुक केले.

रेमडीसिवीर हे इंजेक्शन कोरोन रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे असून या इंजेक्शन ची किंमत ३००० ते ५४०० इतकी आहे. परंतु रुग्णांवर  पडत असलेल्या आर्थिक बोझाचा विचार करून  रेडक्रॉस संचलित केदारनाथ मेडिकल मार्फत रेमडीसिवीर हे करोना रुग्णांसाठी लागणारे महत्वाचे इंजेक्शन जळगाव जिल्ह्यात सर्वात अत्यल्प दारात म्हणजे फक्त ११५०/-  रुपयात  उपलब्ध करून दिले आहे.

यामुळे रुग्णांना आर्थिक फार मोठा आधार मिळत आहे. हीच खरी समाजसेवा  असून रेडक्रॉसच्या सामाजिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी दिले आणि केदारनाथ मेडिकलचे संचालक निरंजन पाटील व भानुदास नाईक  यांचा व रेडक्रॉसच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

महापौर पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच रेडक्रॉसला भेट दिली.  या निमित्त रेडक्रॉसच्या वतीने सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा,  केदारनाथ मेडिकलचे संचालक भानुदास नाईक, निरंजन पाटील,  वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर सोनवणे हे उपस्थित होते.

चिमुकल्यांना दिलासा मायेचा हात, राष्ट्रवादी युवती उपाध्यक्ष झाल्या भावुक

0
dipika bhamare

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । जिल्ह्यात पक्षीय काम करतांना फिरावं लागत असेच एकदा येथून प्रवास करतांना मेहरूण तलावजवळ लहान मुलं खेळतांना दिसली साहजिकच त्यांच्या सोबत संवाद साधतांना त्यांच्या समस्या ही समजावून घेतल्या आणि राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा दीपिका भामरे भावुक झाल्या.

लहान मुलांना त्यांनी खाऊ दिला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव बघून गहिवरून आलं. मुलांच्या सोबत संवाद साधतांना त्यांच्या पालकांसोबत ही संवाद साधला गेला. त्यांचा समस्या कळत असतांना समाधानाची लहर ही समजली, असे दीपिका भामरे यांनी सांगितले.