⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024

सोनवद उपग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध करावा- रा.काँ.विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय पाटील

0
vijay patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. सोनवद येथील ग्रामीण रूग्णालयात २० बेड व १० ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष तथा अहिरे बु ग्रा.पं.सदस्य विजय पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दरम्यान शहरी भागातील कोरोनाची स्थिती पाहून ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात कोरोना सेंटरमध्ये रूग्णांसाठी बेड कमी पडत आहे. त्यात दिवसेंदिवस अजून रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण शहरी भागात उपचार घेण्यास नकार देत आहे.

ही परिस्थिती पाहून सोनवद उप ग्रामीण रूग्णालयात २० बेड व १० ऑक्सीजन बेडची सुविध उपलब्ध करून द्यावी जेणे करून ग्रामीण भागातील रूग्णांना वेळवर योग्य उपचार घेतील. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष तथा अहिरे बु ग्रा.पं.सदस्य विजय पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी  यांच्याकडे मागणी  केली आहे.

शामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन !

0
galedharak

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । मनपाने गाळेधारकाविरोधात सुरु केलेल्या कारवाईच्या निषेर्धात शहरातील १६ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला असून अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आज बुधवारी शामा प्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

मनपाने गाळेधारकाविरोधात सुरु केलेल्या कारवाईच्या निषेर्धात शहरातील १६ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे. जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी हे महानगरपालिकेचे कर्ज, रस्ते दुरूस्ती, इलेक्ट्रिक बिले भरणे, अधिकारी व कर्मचारी यांचे पगार करणे असल्यामुळे वारंवार गाळेधारकांना धमकावून पैसे वसूल करत आहे. त्यामुळे जळगाव शहरात गाळेधारकांनी बेमुदत बंद पुकारले आहे. कोरोना महामारीत गाळेधारकांची परिस्थीत नाजूक आहे. या परिस्थितीमुळे महापालिका सक्तीची वसुली करत आहे. वारंवार पैश्यांसाठी तगादा लावत असल्यामुळे गेल्या २७ मार्च पासून बेमुदत संपावर आहे. संपाचा आज पाचवा दिवस उजाळला परंतू अद्याप शहरातील १६ व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही. महापालिकेचा निषेध करण्यासाठी आज श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानासमोर गाळेधारकांनी भिकमांगो आंदोलन केले.

या भिक मांगो आंदोलनातून  जे काही पैसे जमा होती त्या पैश्यातून आयुक्तांनी शहराचा विकास करावा असे  देखील त्यांनी सांगितले. याप्रसंगी राजू देसले, गणेश जगताप, कल्पेश सोनी, वसंत भावसार, मयूर पवार, राजेंद्र बाविस्कर, शबीर शेख सय्यद, बाबू परदेशी, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

मानियार बिरादरीच्या रेमडेसिव्हर इंजेक्शन उपक्रमास भरघोस प्रतिसाद

0
maniyar biradari jalgaon

जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे इंजेक्शन हे सर्व समाजातील गरजू रुग्णांना फक्त ७४९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून आज सकाळपासून रात्री पर्यंत सुमारे २६२ गरजू रुग्णांना ७४९/- रुपयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले तर ३४ गरीब रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले. अशा प्रकारे २९६ इंजेकॅशन वाटप करण्यात आले.

जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी च्या या उपक्रमास जिल्हा भरातील प्रतिष्ठित सुज्ञ व सर्व समाजातील लोकांनी स्वागत केले असून बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांना अभिनंदनाचे व कौतुकाचे दूरध्वनी व मेसेजेस टाकण्यात आलेले आहे. समाजातील सर्व लोकांचे अशाच प्रकारचे सहकार्य मिळाल्यास हा उपक्रम पूर्ण जिल्हाभरात राबवण्याची इच्छा फारुक शेख यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामिण भागातील गरजवंतांची मोठया प्रमाणात मागणी

तालुका स्तरावर रुग्णाची देखभाल होत असून मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हर ची मागणी दिसून येत आहे. शहरातील अद्याप काही मेडिकल मध्ये अवाजवी भावाने इंजेक्शन दिले जात असल्याची खंत सुद्धा शेख यांनी व्यक्त केली असून चेमिस्ट असो ने सुद्धा सामाजिक बांधीलकीला जपली असली तरी सर्व सदस्य सहकार्य करीत नाही

जळगाव जिल्ह्यात आज देखील ११३९ नवीन कोरोना रुग्ण; १४ जणांचा मृत्यू

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगावातील कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढताच आहे. आज देखील जिल्‍ह्‍यात एकूण ११३९ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर आज कोरोनामुळे आज देखील  १४ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. जळगाव शहरापाठोपाठ चोपडा, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. जळगाव,चोपडा येथे दररोज अडीचशेपेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज  ९९६ रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळ बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ५९० वर गेली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८९ हजार ०१८ झाली आहे.  जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ८०३ रुग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात मृताच एकूण आकडा १६२५ वर गेला आहे.

मृत्यूचा तांडव सुरूच

कोरोनामुळे गेल्या पंधरा ते विस दिवसापासून जळगाव जिल्ह्यात मृत्यूचा तांडव सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून दहाच्या वर कोरोना बाधितांचा दररोज मृत्यू होत आहे. आता सलग तीन दिवसापसून १४ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज देखील चौदा जणांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २८३, जळगाव तालुका १७; भुसावळ ३३, अमळनेर ९३; चोपडा २७७; पाचोरा ३५; भडगाव २०; धरणगाव ५४; यावल १३; एरंडोल ४९, जामनेर ३३; रावेर २१, पारोळा १८; चाळीसगाव ९७; मुक्ताईनगर ११; बोदवड १७ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे ११३९ रूग्ण आढळून आले आहेत.

अजिंठा चौफुली परिसरातून दुचाकी चोरीला ; आठ दिवसानंतर गुन्हा दाखल

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून दुचाकी लांबविल्याची घटना २३ मार्च रोजी घडली होती. दरम्यान, घटनेच्या ८ दिवसानंतर आज बुधवारी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबनकुमार प्रल्हाद सोनी (वय ४३, रा. सदाशिवनगर) हे गाडेगाव येथील सुप्रिम कंपनीत सुरक्षा गार्ड म्हणून कामाला आहेत. गाडेगाव येथील कंपनीत जाण्यासाठी त्यांच्याकडे  (एमएच १३ बीसी १०४३) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे २३ रोजी त्यांनी अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी उभी केली होती. यांनतर बसने ते ड्युटीवर गेले. रात्री ११.३० वाजता परत आले असता त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे आढळुन आले. त्यांनी दुचाकी लावलेल्या ठिकाणाचा परिसर पिंजून काढला होता. दुचाकी मिळून आली नसल्याने त्यांनी २४ मार्च रोजी ऑनलाईन तक्रार केली होती. आठ दिवसानंतर आज ३१ मार्च रोजी सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

शासकीय रुग्णालयात वॉर रूमसह गठीत समित्यांमुळे नागरिकांचे काम झाले सोपे

0
jalgaon district general hospital

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील जनसंपर्क कक्षात  “वॉर रूम” उभारण्यासह  “खाटा व्यवस्थापन समिती” नेमण्यात आलेली आहे. या वॉर रूम व समितीला गेल्या आठ दिवसात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात गैरसोय दूर झाली आहे.

वॉर रूममध्ये चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफ्ट पद्धतीने लावण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल कोविड १९ पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करणे, रुग्णांच्या जेवणासह इतर सुविधांविषयी विचारणा करणे तसेच वॉर्डातील दाखल रुग्णांना देखील या वॉर रूम सुविधेचा लाभ घेता आला आहे. या वॉर रूमचे ८७६७१९९४७६ आणि ८७६७२४०८०१ हे क्रमांक नागरिकांसाठी जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यासह शहरातील व इतर ठिकाणाहून संदर्भित होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी खाटा व्यवस्थापन समिती नेमण्यात आलेली आहे. ऑक्सिजन  किंवा व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या कोविड १९  पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय राखीव आहे.  या समितीला गेल्या आठ दिवसात खाटा उपलब्धतेबाबत जिल्हाभरातून विचारणा झाली आहे. त्यामुळे रुग्णांची धावपळ न होता खाटा व्यवस्थापन अचूक पद्धतीने होत आहे. या समितीत ३ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी ९३५६९४४३१४ हा क्रमांक त्यासाठी जारी करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयात कोविड १९ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण उपचारांती मृत झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी मृत्यू समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मयत रुग्णांच्या नातेवाईकांना सांत्वन व मदतीसाठी या समितीने गेल्या आठ दिवसात भरीव काम केले असून येथे ४ निष्णात कर्मचारी नेमण्यात आले आहे. या समितीचा ८७६७३२४१३३  हा क्रमांक रुग्णालय प्रशासनाने नागरिकांसाठी जाहीर केला आहे.

गळफास घेवून किनगावच्या तरूणाची आत्महत्या

0
kingaon crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. नवल दगडु भोई (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवल भोई याचा गावात शेंगदाणे फुटाणेचा व्यवसाय आहे.  या तरूणाने आज ३१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या हुकला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

मयत नवल भोई याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई व भाऊ असा परिवार आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय धनंजय पाचपोळे हे करीत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्याला १० वर्ष सश्रम कारावास

0
molestation

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । शहरातील एका आरोपीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यानंतर देखील तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता न्यायालयाने आरोपीला १० वर्ष सश्रम कारावास आणि ३ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जळगांव येथील जयकुमार अशोक सोनवणे याने पिडीतेशी तिच्या मैत्रीणीकडून जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने वेळोवेळी बलात्कार केला मात्र तिच्याशी लग्न केले नाही, सदरील अत्याचारातुन पिडीतेस मुलगा जन्मास आला. तरीही लग्न न केल्याने पिडीतेने शहर पोलिस स्टेशन, जळगाव येथे गुर, ४०/२०१५ अन्वये कलम ३७६ व इतर सह कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या बाबत सविस्तर हकीकत अशी की, यातील पिडीता व आरोपी दोघे एकाच समाजाचे असुन पिडीता सन २०११-२२ मध्ये जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी वसतिगृहात राहत होती. त्यानंतर सन २०१३-१४ पावेतो पिडीता तिचे मैत्रीणी सोबत एकाच खोलीत रहात होती. त्या वेळी आरोपीने तिच्या मैत्रीणीमार्फेत पिडीतेशी जवळीक साधून तिला प्रेमात गुंतवून आरोपीने त्याच्या घरी, साईराम लॉज, जळगाव येथे तसेच वेळोवेळी कार मध्ये निर्जन स्थळी नेवून जुलै २०१४ पासून फेब्रुवारी २०१५ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले.

सदर खटला सेशन केस नं. १३०/ हा जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, जळगाव पी.वाय लाडेकर यांच्या न्यायालयात चालला. यात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. पिडीतेचा जबाब व वैदयकिय पुरावा विशेषत डीएनए रिपोर्ट या बाबी महत्वाच्या ठरल्या. सदरील बलात्कार प्रकरणी आरोपीस दोषी ठरवून भा.द.वि. कलाम ३७६ खाली १० वर्ष सश्रम कारावास व रु ३,००,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख मात्र) दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद व कलम ४१७ खाली फसवणुकी बाबत सहा महिने सनम कारावास व रु.३०००/- दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तीन लाख रुपये दंड वसुल झाल्यावर ती रक्कम पिडीतेस व त्यांच्या मुलास नुकसान भरपाई म्हणून चरितार्थासाठी देण्याबाबतचे आदेश आहेत. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल ऍड.पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.

Breaking : ‘त्या’ २७ नगरसेवकांवर होणार अपात्रतेची कारवाई

0
bjp jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी भाजपाने तयारी केली आहे. पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवावे यासाठी आज नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले असल्याची माहिती गटनेते भगत बालाणी यांनी दिली आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता जळगाव मनपा भाजपा गटनेता भगत बालाणी यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.

शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्यानंतर या नगरसेवकांना भाजपाने प्रत्यक्ष, मोबाईल, व्हाट्सअप, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता मात्र त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप आहे. २७ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.