⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा दुसरी लाट कमी होतानाचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. दरम्यान, आज गुरुवारी नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज गुरुवारी दिवसभरात ७८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ८१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १२ जणांचा बळी गेला आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाने थैमान घातले होते. जिल्ह्यात रोज १००० ते १२०० रुग्ण आढळून येत होते. मृताचा आकडाही वाढीस गेला होता. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक संचारबंदी लावण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम आता रुग्णांवर दिसून येत आहे. मागील महिनाभरापासून आणि विशेषत: मे महिना सुरु झाल्यापासून  जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे.

गुरुवारी दिवसभरात ७ हजार ५४२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७८९ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ३१२ वर गेली आहे.. तर ८१६ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार ९७१ वर पोचला. जिल्ह्यात सध्या ९ हजार ८५५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर मागील काही दिवसापासून मृताचा आकडाही घटना दिसून येत. जिल्ह्यातील रिकव्हरी दर ९०.८१ वर  गेल्याने जिल्ह्यासाठी समाधानकारक आहे.

जळगाव शहर १२२, जळगाव ग्रामीण ३३, भुसावळ १०६, अमळनेर १६, चोपडा ३७, पाचोरा २९, भडगाव १५, धरणगाव ०७, यावल ४१, एरंडोल ११, जामनेर ३०, रावेर ५०, पारोळा २७, चाळीसगाव ८७, मुक्ताईनगर १६१, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ०४.

अमळनेर पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई : १ जेसीबी, ७ डंपर पकडले

0
amalner

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । अमळनेर तालुक्यातील जळोद येथे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता तापी नदीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी सात डंपर व एक जेसीबीसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून चालक मालकासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील आतापर्यंत झालेली सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून जळोद येथून तापी नदीतून मोठ्या प्रमाणात जेसीबी मशीनने वाळू उपसा करून डंपरच्या साहाय्याने वाळू चोरी केली जात होती. अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, रवींद्र पाटील, भूषण बाविस्कर, अमोल पाटील, योगेश महाजन, सूर्यकांत साळुंखे यांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना तापी नदीत अनेक डंपर वाळू वाहतुकीसाठी उतरल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी अचानक छापा टाकला असता तेथे सात डंपर व एक जेसीबी मशीन आढळून आले तर इतर डंपर व ट्रॅक्टर तसेच जेसीबी मशीन पळवून नेण्यात आले.

४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे जेसीबी (एमएच१९/सीयु५७६५) हा चालक गोपाळ रवींद्र पाटील (नांद्री) व मालक अमोल रमेश पाटील (अमळगाव), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम४६८५), चालक व मालक विक्की सतीश ललवाणी, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९/झेड- १९७०) चालक व मालक दीपक शालीक पाटील (नांद्री), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम५९४९) चालक विनोद महादू निकम (शिरुडनाका) व मालक किशोर बापू पाटील (विवेकानंद नगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीजी७०३१) चालक दिनेश नागो पाटील (बुधगाव, ता. चोपडा) व मालक अरुण पुंडलिक पाटील (रवीनगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीए २९०), चालक संतोष हिरामण जावळे (वाघोदा) व मालक अरुण पुंडलिक पाटील, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (जीजे ०१ डीझेड७५०)वरील चालक दिलीप आत्माराम पाटील (वाघोदे) व मालक सुरेश देविदास वालडे, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच०४/डीडी२१३६) चालक पपू शांताराम शिंगाणे (भोईवाडा), मालक भूषण आत्माराम बडगुजर यांच्यावर अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील ३६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४५ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

आण्णा उर्फ अर्जुन वासुदेव कोळी (जळोद) याच्या मालकीचे एक जेसीबी, ४ ट्रॅक्टर व १ डंपर नदी पात्रातून पळून गेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.

चारवेळा निविदा काढूनही ठेका नाही

अमळनेर तालुक्यात बोरी नदीतून ट्रॅक्टर व टेम्पोद्वारे, तापी नदीतून डंपर व ट्रॅक्टरद्वारे तर पांझरा नदीतून ट्रॅक्टर व डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सरार्स वाळू चोरता येत आहे. त्यामुळे चारवेळा निविदा काढूनही कोणीही ठेका घेण्यास पुढे आले नाही. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडून पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांनी  कारवाई करण्याची मागणी होत आहे.

थोरगव्हाण येथील तापी नदीपात्रातील अवैधरीत्या वाळू उपसा रोखण्यासाठी नाकाबंदी

0
untitled 1

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील तापी नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसिलदार यांनी विशेष गस्त पथके नियुक्त केली आहे. यामुळे वाळू वाहतुकरणा-यामधे खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की यावल तालुक्यात थोरगव्हाण, पथराडे, शिरागड  येथुन मोठ्या प्रमाणात तापी नदीतुन खुलेआम अवैध मार्गाने वाळूचा उपसा करून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून अवैध वाळूची वाहतूक सुरूच होती. उलट पक्षी कार्यवाही करण्या-या पथकावर वाळू माफियांचे हल्ले  झाल्याचे देखील घटना घडल्या आहेत.

दरम्यान चार दिवसापुर्वी अवैध वाहतुकीचे ट्रक्टर पकडण्यासाठी जाणा-या  महसूल विभागाचे मनवेल येथील तलाठी स्वन्पिल तायडे याच्या अंगावर टँक्टर त्याच्या पायावरून गेल्याने त्याचा पायास गंभीर दुखापत करण्यात आली. असल्यामुळे अखेर तहसिलदार महेश पवार यांनी तात्काळ या घटनेची दक्षता घेत नाकाबंदी केली असून अवैध वाळू रोखण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. थोरगव्हाण गावातील मुख्य वाळूची चोरटी वाहतुक रोखण्यासाठी तलाठी मुकेश तायडे, कोतवाल धनराज महाजन, होमगार्ड कैलास लावणे या पथकांनची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाचोरा व भडगावात १५ ते १९ मे पर्यंत जनता कर्फ्यु

0
janta farfew (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यासह पाचोरा-भडगावात तालुक्यात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी व तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडित करता यावी यासाठी दिनांक १५ ते २२ मे पर्यंत ७ दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांनी आ.किशोर अप्पा पाटील यांना आधी पेक्षा रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याने जनता कर्फ्युचा कालावधी कमी करण्याची विनंती केल्याने सर्व व्यापारी बांधवांच्या विनंतीला मान देत अखेर जनता कर्फ्यु दि. १५ ते २२ मे ऐवजी दि.१४ मे च्या रात्री बारा वाजेपासून ते दि १९ मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्थात पाच दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी या झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घेत कासोसिने जनता कर्फ्यु पाळत आपल्या परिसरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी एकजूट दाखवावी व जनता कर्फ्युचे पालन करावे असे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले आहे.

दरम्यान आधीच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरल्या प्रमाणे अत्यावश्यक सेवेतील केवळ मेडिकल पूर्णवेळ तर दुध डेअऱ्या या सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ६ ते ९ या वेळात उघड्या ठेवता येणार आहेत तर कृषी केंद्र मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर सर्व

प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने ,किराणा दुकाने भाजीपाला संपूर्णपणे बंद ठेवण्याबाबत सहमती झाली आहे. तसेच  विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध देखील  दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व जनतेने या जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होत आपण जबाबदार नागरिक आहोत हे सिद्ध करावे असे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने आ.किशोर अप्पा पाटील यांचेवतीने करण्यात आले आहे.

रिक्षाच्या धडकेत ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । रिक्षाच्या जोरदार धडकेत ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना जळगावातील समता नगरातील गुरूकृपा डेअरीजवळ घडलीय. गंगूबाई जयसिंग जाधव (वय-८०) असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगूबाई जाधव या समता नगरातील हमाल नगरात आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी १२ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वृध्द महिला इस्त्री करण्यासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. समता नगरातील गुरूकृपा डेअरी जवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षा (क्रमांक एमएच १९ व्ही ७१८) ने त्यांना जोरदार धडक दिली.

त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून हा फॅक्चर झाला आहे. अपघात होताच रिक्षाचालक रिक्षा घेवून पसार झाला आहे. आजूबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. गंगूबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत महाराष्ट्रात १ जूनपर्यंत निर्बंध कायम; जाणून घ्या काय असणार नियम?

0
lockdown

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमीत करण्यात आला आहे.

29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आले होते. आता हे निर्बंध 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असतील.

साथरोग अधिनियम-1897,  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रेक दि चेन’ संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व तद्‌नंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील. त्या व्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहे.

– कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

– यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

– मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

– स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याच्या निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

– दुध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दुध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

– कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील लोकांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

– स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘एसडीएमए’) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

सरपंच ते खासदार… रक्षाताईंच्या राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख

0
raksha khadse

जळगाव लाईव्ह न्यूज  | जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा आज वाढदिवस. रावेर लोकसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा त्या निवडून आल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असून साधी राहणी, स्पष्ट विचार, विकासाचे व्हिजन आणि आपल्या माणसांविषयी आपुलकी हीच त्यांची खरी ओळख. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज एका उंच टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

रक्षा खडसे या सन 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कोथळी (ता. मुक्ताईनगर) च्या त्या सरपंच होत्या. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. शिक्षण सभापती असताना त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

सन २०१४ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली व त्या खासदार झाल्या, त्यानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्या दुसऱ्यांदा याच मतदार संघातून खासदार झाल्या.

रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हिना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे या 17 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते.

सासरे एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर रक्षा खडसे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्य सुरू ठेवले भारतीय जनता पक्षाची भूमिका त्या अत्यंत प्रखरतेने मांडतात.

एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनेही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले होते. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते.

सरकारी वकील विद्या उर्फ राखी पाटील खून खटल्यात पतीला जन्मठेप तर सासऱ्याला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

0
court

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सन २०१७ पासुन सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत पाटील (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) खून खटला जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात कोरोनाच्या अवघड परिस्थितीतही केवळ तीन महिन्यात कामकाज करून संपविण्यात आला.

जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा १३ जानेवारी २०१९ रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील (४२, रा. जामनेर) व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) या दोघांना या गुन्ह्यात अनुक्रमे १४ जानेवारी १९ व २८ जानेवारी १९ रोजी अटक करण्यात आली होती. विद्या पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर पती व सासरे या दोघांनी त्यांना जामनेर येथुन भुसावळ येथील दवाखान्यात नेले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. भुसावळ वेगवेगळ्या दवाखान्यातील डॉक्टर व कंपोऊंडेर यांनी विद्या मयत झाली असल्याचे सांगितले होते.

डॉ.राजेश मानवतकर यांनी विद्याचे पीएम करावे लागेल असे सुद्धा सांगितले होते,परंतु दोघे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा गैरहेतुने मृतदेह परस्पर बेलखेडे (ता.भुसावळ) या मुळगाव अंत्यसंस्कारासाठी नेला, तेथे विद्या पाटील यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या. प्रकरण संशयास्पद वाटल्याने विद्या यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता त्यासही पतीने विरोध केला. त्यामुळे ही माहिती वरणगाव पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह वरणगाव रुग्णालयात नेला. तेथे पंचनामा करून मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या पाटील यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांच्या विरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्या पाटील यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता.त्या सतत मोबाइलवर बोलत असत त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय घेऊन त्यांना मारहाण केली जात होती, असे चौकशी समोर आले होते. साक्षीदारांची तपासणी देखील हेच मुद्दे पुढे आले.

या खटल्यात साक्षीदारांची तपासणी दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू होऊन दि.१६ मार्च २०२१ रोजी पुर्ण करण्यात आली,या दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्यात फिर्यादी गणेश सुरळकर, ज्या डॉक्टरांकडे विद्या यांना उपचारासाठी नेण्यात आले ते डॉ.राहुल जावळे, डॉ. राजेश मानवतकर, चुलत भाऊ सुरज सरदारसिंग पाटील, ज्या वाहनातून त्यांना दवाखान्यात व नंतर अंत्यसंस्काराला नेण्यात आले त्याचा चालक विपुल गोपाल पटेल, मुलगा दुर्वेश उर्फ सोनू भरत पाटील, बहिण प्रिया प्रमोद सोळुंखे, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चंद्रकांत कळसकर,वरणगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी सारिका कोडापे, जामनेर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, जळगाव न्यायालयातील सरकारी वकील सुप्रीया सुरेश क्षीरसागर, जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे,शवविच्छेदन करणारे डॉ. निलेश देवराज व जामनेरचे वकील ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत.

आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी.वाय. लाडेकर यांनी विद्या पाटील यांच्या खून केला म्हणून तिचा पती डॉ.भरत पाटील याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर विद्या पाटील हीचा पती व सासरा लालसिंग पाटील यांना पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघांना दोषी ठरवून प्रत्येकी चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली तर बचाव पक्षातर्फे एस.के. शिरुडे यांनी बाजू मांडली. दरम्यान गुन्हा घडल्यापासून पती डॉ. भरत पाटील हा कारागृहातच होता.

गॅस सिलेंडर दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

0
new (3)

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जळगावातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात  घोषणाबाजी देत आंदोलन केले.

केंद्राच्या दरवाढीचा विरोध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखा आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून ते आकाशवाणी चौकापर्यत हा मोर्चा काढून केंद्र सरकारच्या निषेध नोंदवण्यात आला. यावेळी गॅस सिलेंडरला हार घालून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी चव्हाण, डॉ. सुषमा चौधरी, मंगला पाटील, शकीला तडवी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना सारख्या महामारीत सर्वसामान्य हाताला काम नसल्याने बेहाल झाली असून त्यात केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डीझेल व गॅसची  दरवाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न पडला आहे.  यातच आत्ता प्रत्येक दिवशी पेट्रोल व डीझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यात सुख वाटत आहे. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असं वंदना पाटील म्हणाल्या.

कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून इंधन दरवाढीने दुहेरी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. मोदी सरकारने दाखविलेल्या अच्छे दिन चे स्वप्न भंग पावले आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.  कोरोना काळात जनतेला दिलासा  देण्याएवजी दरवाढ केली जात असल्याने सर्वसामन्यांनी जगावे कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.त