जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । जळगाव शहरातील नऊ आणि इतर ठिकाणी २० अशा जिल्ह्यातील एकूण २९ खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र सुरू करायला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शनिवारी परवानगी दिली आहे. त्यांनी थेट कंपनीकडून ‘काेव्हॅक्सीन’ ही लस विकत घ्यायची आहे. खासगी रुग्णालयांसाठी असलेली तिची किंमत लक्षात घेता रुग्णांना एक डोससाठी तब्बल १३०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील लसीकरणाची माेहिम एक एप्रिल पासून सुरू झाली. त्यावेळी ५० च्या घरात खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू हाेते. मात्र ३० एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे शासकिय केंद्रांवर मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली आहे.
खासगी केंद्रांना काे-व्हॅक्सीन ही लस रुपये एक हजारात मिळणार असून त्यावरील जीएसटी तसेच इतर खर्च मिळून सुमारे १२६० रुपयांत त्यांना ती मिळेल. त्यामुळे किमान १३०० रुपये एका डाेससाठी लाभार्थ्यांना माेजावे लागतील असा अंदाज खासगी रुग्णालयाकडून व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी व शनिवारी मिळून एकूण २९ रुग्णालयांना जिल्हाधिकारी डाॅ. राऊत यांनी लस केंद्रासाठी परवानगीचे पत्र दिले. यात जळगाव शहरातील ९ केंद्राचा समावेश आहे. पूर्वीचे चार खासगी आणि महात्मा ज्याेतिबा फुले याेजनेत संलग्न असलेल्या २३ केंद्रासह आता खासगी लसीकरण केंद्रांची संख्या ५६ हाेणार आहे. लसीकरण केंद्र म्हणून परवानगी मिळालेल्या हाॅस्पिटलने संबधित लस उत्पादक कंपनीशी ईमेलद्वारे संपर्क साधायचा असून त्यांच्या नियमानुसार पैसे भरून लसीची मागणी नाेंदवायची आहे. सीरम या कंपनीची काेविशिल्ड या लसीची आगाऊ मागणी आगामी दोन ते तीन महिन्यांसाठी बंद असून सध्या केवळ भारत बायोटेक कंपनीचीच लस उपलब्ध आहे. त्यामुळे सध्यातरी नव्याने सुरू हाेणाऱ्या खासगी लसीकरण केंद्रावर काेव्हॅक्सीन हीच लस उपलब्ध हाेणार आहे.
शहरात सुरू हाेणारे नवे ९ खासगी केंद्र : डाॅ. राजेश पाटील (विश्वप्रभा हाॅस्पिटल), आनंद पलाेड (महेश प्रगती मंडळ), डाॅ. राजेंद्र भालाेदे (कमल हाॅस्पिटल), डाॅ. पराग चाैधरी (विजेंद्र हाॅस्पिटल), हरीश मुदंडा (विश्व हिंदू परिषद), डाॅ. याेगेंद्र नेहेते (नेहते हाॅस्पिटल), चंद्रकांत नाईक (जैन इरिगेशन सिस्टीम), अमरेंद्रनाथ चाैधरी (कांताई हाॅस्पिटल), डाॅ. पारस जैन (राेटरॅक्ट क्लब).
जिल्ह्यात सुरु हाेणारे नवे २० केंद्र
डाॅ. संदीप पाटील, माऊली हाॅस्पिटल, रावेर, डाॅ. उमाकांत पाटील,श्रीयुला हाॅस्पिटल, जामनेर, डाॅ. विनाेद चाैधरी, आई हाॅस्पिटल, भुसावळ, डाॅ.दिनेशसिंग पाटील,द्वारकाधिश हाॅस्पिटल, भुसावळ, डाॅ. धनंजय पाटील, माेरया हाॅस्पिटल पाराेळा, डाॅ. प्रविण पाचपांडे,पाचपांडे हाॅस्पिटल, डाॅ. निलेश पाटील, कांताई हाॅस्पिटल, पाराेळा, नितीन अहिरराव, राेटरी क्लब चाेपडा, डाॅ. विजय पाटील, वृंदावन हाॅस्पिटल, पाचाेरा, डाॅ. संभाजीराजे पाटील, श्रीसाई हाॅस्पिटल, पाचाेरा, डाॅ. आशिष वाघ, मिरा हाॅस्पिटल, जामनेर, डाॅ. प्रदीप फेगडे, मुक्ताई प्रसुतीगृह, भुसावळ, डाॅ. वैशाली नेरकर, आई हाॅस्पिटल, पाराेळा, डाॅ.सुरेश पाटील, श्रध्दा हाॅस्पिटल, पाराेळा, डाॅ.तुषार चाैधरी, दत्त हाॅस्पिटल, सावदा, विजय माेहन, सिंधी साई बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, आेम ठाकुर, रिलायन्स जीआे, (अमळनेर, चाळीसगाव व जळगाव), डाॅ. भारत पाटील, पाटील हाॅस्पिटल, चाेपडा.