⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

हुश्श… जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले ‘कोव्हॅक्सिन’चे २३०० डोस; इथे मिळतील डोस

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । जिल्ह्यात अनेकांनी काेव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता परंतु दुसरा डोस मिळत नसल्याने त्यांची धावपळ होत होती. शनिवारी २३०० नवीन डोस प्राप्त झाले आहेत. आता ज्यांनी पहिला डोस घेतला होता अशांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरातील ५ केंद्रावर कोविशील्ड तर दाेन केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे डाेस उपलब्ध असणार आहे.

मनपाच्या शाहू हाॅस्पिटल, डी. बी. जैन रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, मुलतानी हाॅस्पिटल व शाहिर अमर शेख रुग्णालय या पाच केंद्रांवर कोविशील्ड लस उपलब्ध असून ती ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोससाठी असणार आहे. दरम्यान रेडक्राॅस साेसायटीचे लसीकरण केंद्र रविवारी बंद असणार आहे.

या दोन केंद्रांवर कोव्हॅक्सिन : गणपती नगरातील स्वाध्याय भवन व मायादेवीनगरातील राेटरी भवन या दोन केंद्रांवर रविवारी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार असून ती केवळ ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोससाठीच मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील केंद्रनिहाय लसींचा साठा

जळगाव जिल्हा रुग्णालय ३०० कोविशिल्ड, जामनेर उपजिल्हा रुग्णालय १०० कोव्हॅक्सिन, मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालय १० कोव्हॅक्सिन, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय १०० कोव्हॅक्सिन, पाराेळा ग्रामीण रुग्णालय १९० कोव्हॅक्सिन, रावेर ग्रामीण रुग्णालय ३० कोविशिल्ड, १०० कोव्हॅक्सिन, यावल १०० कोव्हॅक्सिन, भडगाव ११० कोव्हॅक्सिन, बाेदवड १० कोव्हॅक्सिन, एरंडाेल ४० कोव्हॅक्सिन, भुसावळ रेल्वे हाॅस्पिटल १०० कोव्हॅक्सिन, शाहु रुग्णालय १३१० कोविशिल्ड, ७०० कोव्हॅक्सिन, बद्री प्लाट,भुसावळ २०० कोव्हॅक्सिन, पाल ग्रामीण रुग्णालय ५० कोव्हॅक्सिन, पिंपळगाव, पाचाेरा १४० कोविशिल्ड, ११० काेव्हॅक्सिन, पहुर १०० काेव्हॅक्सिन, अमळनेर १०० काेव्हॅक्सिन, सावदा ४० कोविशिल्ड, १५० कोव्हॅक्सिन, वरणगाव १० कोविशिल्ड,२०० कोव्हॅक्सिन, दीपनगर, वरणगाव २० कोविशिल्ड, अमळनेर ३० कोविशिल्ड, वरणगाव फॅक्टरी १५० कोविशिल्ड, फैजपुर १३० कोविशिल्ड, तळई, एरंडाेल ३० कोविशिल्ड.