---Advertisement---
बातम्या

आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार ; एकाला अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ |  आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्या प्रकरणी नरेंद्र सुधाकर घोलप (34, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हापेठ, जळगाव) यास जळगावात रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे.

संशयास्पद युझर आयडीबद्दल विचारणा केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून घोलप हा स्वत:च्या मोबाइल क्रमांकाचा वापर करीत रेल्वेचे ऑनलाइन आरक्षित तिकिटांचे लॅपटॉपवरून बुकिंग करीत असल्याचे उघड झाले शिवाय आरक्षित तिकीटे 50 ते 100 रुपये अधिक घेऊन तिकीट विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक मनोज सोनी, मुख्य आरक्षण अधिकारी सुनील मराठे, विनोद जेठवे यांना जिल्हा पेठेतील प्लॉट नंबर 101, लक्ष्मी निवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटनजीकच्या घरात संशयास्पद युझर आयडीवरून तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी पथकाने सायंकाळी कारवाई करीत घोलप यास ताब्यात घेतले.

railway crime jpg webp webp

घोलप याने तयार केलेल्या युझर आयडी व पासवर्डला कार्यालयीन संगणकावरून आयआरसीटीसीच्या वेबसाईडवर तपासणी केली असताना चार हजार 929.60 रुपये किमतीचे चार ‘लाइव्ह रेल्वे तिकीट’ व 12 हजार 438.35 रुपयांचे पाच ‘फास्ट रेल्वे तिकीट’ असे एकूण 17 हजार 367.95 रुपयांचे नऊ रेल्वे तिकीट काढल्याने तिकीटांसह लॅपटॉप जप्त करण्यात आला व नरेंद्र सुधाकर घोलपविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---