---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

प्रभात समिती सभापतीच्या तीन जागांवर भाजप तर एका जागेवर शिंदे गटाचा विजय

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२३ ।  जळगाव शहर महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींची मुदत संपुष्टात आल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून दोन तर भाजपकडून चार व एमआयएम कडून एक अर्ज दाखल करण्यात आला होता.

mnp jpg webp

त्यानंतर सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्रभाग समिती एक च्या सभापती पदासाठी भाजपच्या उमेदवाराने भरलेला अर्ज मागे घेतला त्यामुळे शिंदे गटातील नवनाथ दारकुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

---Advertisement---

तर प्रभाग समिती दोन मध्ये शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांचा पराभव करून भाजपचे रंजना सपकाळे विजयी झाल्या आहेत तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये एमआयएमच्या नगरसेविका यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार अंजनाबाई सोनवणे यांचा विजय झाला.

प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये भाजप तर्फे एकमेव अर्ज आल्यामुळे विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---