नगरपरिषदेच्या आगामी निवडणूका भाजपा स्वबळावर लढेल, नवलसिंग पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । वरणगाव येथील भारतीय जनता पार्टीचे प्रभारी जिल्हा सरचिटणीस नवलसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत येत्या नगरपरिषदेच्या आगामी निवडणूका भाजपने केलेल्या विकास कामांच्या जोरावर नगरपरीषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवू आपलीच सत्ता येईल, असा आशावाद पाटील यांनी व्यक्त करीत येत्या तीन महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्यकर्त्यांना जोरात कामाला लागण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मा. नगराध्यक्ष सुनील काळे, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी, गोलू झाल्टे, हाजी अल्लाद्दीन सेठ, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील माळी, अजय पाटील, शामराव धनगर, सुभाष वाघ, प्रणिता पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाले, मिलिंद भैसे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख आदींची उपस्थिती होते. यावेळी शेख मुस्लिम अन्सारी यांची तालुका सरचिटणीसपदी तर तालुका उपाध्यक्षपदी शेख निजाम अलीम यांची निवड करण्यात आली.
शिंदे व फडणवीस सरकार येताच येत्या पंधरा दिवसातच सरकारने पेट्रोलचे ५ तर डिझेल ३ रुपये कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. नगराध्यक्ष व सरपंच लोकनियुक्त निवड करण्याच्या निर्णयाने लोकांमध्ये उत्सुकता आहे. व राज्यातल्या ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान आकाश निमकर, भाजयुमो शहराध्यक्ष डी.के.खाटीक, शहराध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी मनीषा पाटील, तालुकाध्यक्ष रुख्मिणी काळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संगीता माळी, निता तायडे, डॉ.नानाभाऊ चांदणे, कृष्णा माळी, संदीप माळी, पप्पू ठाकरे, संतोष कश्यप, नाना चौधरी, सरचिटणीस योगेश माळी, कुंदन माळी, नटराज चौधरी, रामभाऊ माळी , ज्ञानेश्वर घाटोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.