जळगाव लाईव्ह न्यूज । स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी भाजप जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या जळगाव येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती
आमदार सुरेश भोळे (राजू मामा), भाजप प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रवीण आलाई, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’ आणि सावरकरांचा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

या प्रसंगी माअध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, मनपा गटनेते प्रकाश बालानी नगरसेवक राजेंद्र घुगे ,सुरेखा तायडे, अँड सुचिता हाडा,गायत्री राणे, रंजना वानखेडे,जिल्हा पदाधिकारी, विशाल त्रिपाठी ,राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, उदय भालेराव, दीपक परदेसी, रेखा वर्मा, पितांबर भावसार, नीला चौधरी मनोज भांडारकर, प्रकाश पंडित मयूर भदाणे, अमित देशपांडे , गणेश माळी, मंडल अध्यक्ष अजित राणे विनोद मराठे आनंद सपकाळे, अतुल भारी, जिल्हा महिला अध्यक्षा नीतू परदेसी, या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते








