⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | जळगाव मुक्ताईनगरनंतर ‘अबकी बार’ भुसावळ

जळगाव मुक्ताईनगरनंतर ‘अबकी बार’ भुसावळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । जळगाव मुक्ताईनगरनंतर आता भुसावळमध्ये भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण तशी चर्चा राजकीय मंडळींमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

भाजपाची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीपासून शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम राबवित भाजपचे नगरसेवक आपल्याकडे खेचणे सुरु ठेवले आहे. मार्च महिन्यात भाजपचे २७ नगरसेवक फोडल्यानंतर तीन दिवसापूर्वी ३ नगरसेवक फोडून होते. अजूनही काही नगरसेवक सेनेच्या वाटेवर आहे.  मुक्ताईनगरमध्येही शिवसेनेने भाजपचे ६ नगरसेवक गळाला लावले. त्यानंतर आता  जळगाव मुक्ताईनगरनंतर अबकी बार भुसावळवर निशाणा साधत भाजपचे काही पदाधिकारी व नगरसेवक नजीकच्या काळामध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय मंडळींमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी जाहीररीत्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे पदावर आहेत ते फक्त औपचारिक असल्याचे दिसून येत आहे. अर्धे भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेले, तर भुसावळचे उरलेले काही नगरसेवक हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून नजीकच्या काळामध्ये शिवबंधन बांधणार असल्याचे समजते.

येत्या सहा महिन्यांत नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी पक्षासोबत गेल्यास नक्कीच शहरातील विकास कामे मार्गी लागतील, असा हेतू यामागे दिसून येत आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही भुसावळकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, रस्ते असो की अमृत योजना आदी प्रत्येक कामाकडे जातीने लक्ष देऊन भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.