भाजपा उत्तर महाराष्ट्र आयुर्वेद आघाडी सहसंयोजक पदी डॉ. निखिल चौधरी
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । नुकतीच भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश ऊत्तर महाराष्ट्र विभाग संघटनात्मक बैठक नाशिक येथील भाजपा कार्यालयात पार पडली. यावेळी जळगावचे लारण्या नेत्रालयाचे प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. निखिल चौधरी यांचा प्रवेश सोहळा उ.म. महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितुच पाटील यांच्या पुढाकाराने पार पडला. डॉ. चौधरी यांंची वैद्यकिय आघाडीचे आयुर्वेद विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी निवड करण्यात आली.
भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे ,प्रदेश सहसंयोजक डॉ. राहुल कुलकर्णी ,प्रदेश सहसंयोजक डॉ. प्रशांत पाटील, सहसंयोजक डॉ. प्रसाद डोंगरगावकर आणि प्रदेश समन्वयक व प्रवक्ता डॉ. स्वप्निल मंत्री, उ.म. संयोजक डॉ.राकेश पाटील, आयुर्वेद विभागाचे संयोजक डॉ. विष्णू बावणे, वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु पाटील,डॉ नरेंद्र ठाकूर उ म सहसंयोजक, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत भोंडे, यांच्या उपस्थितीत वैद्यकिय आघाडी जिल्हावार संघटनात्मक नेमणुका आणि रुग्णमित्र अभियानाची संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
याचवेळी डॉ. निखिल चौधरी यांची नियुक्ती व प्रवेश सोहळा पार पडला. उत्तर महाराष्ट्रातील नेते ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे तसेच महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ.निखील चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.