जळगाव जिल्हाराजकारण

भाजपची दुसरी यादी आली ; जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. जळगाव मधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दुसरीकडे रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली

भाजपने जाहीर केलेल्या आजच्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र यानंतर ऐनवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं होत. मात्र आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला विद्यमान उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button