बातम्या

भाजपने नेहमीच ओबीसींची हेळसांड केली : मुंडेंना नेहेमीच अपमानित केले – एकनाथराव खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ ।  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.भाजपने नेहमीच ओबीसींची हेळसांड केलेली आहे असे एकनाथराव खडसे म्हणाले.

यावेळी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले कि, आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर , गोपीनाथ मुंडे यासारख्या अनेक नेत्यांचा भाजपमध्ये अपमान करण्यात आला. मी आणि मुंडे यांनी ३० वर्ष भाजपमध्ये काम केले आहे. पूर्वी भाजपमध्ये ओबीसींना घेत सुद्धा नव्हते. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने किती त्रास दिला हे मला माहिती आहे.

त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघण्यास भाग पाडलं. मध्यंतरी त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा आला होता. तीच परिस्थिती आता पंकजा मुंडेंवर ओढावलेली आहे.

आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे यांना आता ओबीसी चेहरा पाहिजे. पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे, असेही खडसे म्हणाले.

Related Articles

Back to top button