नवाब मलीक यांचा राजीनामा घ्यावा : भाजपची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळासह राष्ट्रवादी पक्षाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अश्या मागणीचे निवेदन भाजपातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बॉम्बस्फोट गुन्हेगारांची संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब शरद पवार यांनी घेतला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांचा बाबतीत वेगळा निर्णय करत आहे. असे दिसून येत आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वानी समर्थन करायला हवे, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचे जबाब हे कारागृहातून जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, मंत्र्यांच्या राजीनामा घेणार नसतील तर राजकारणाचा स्तर खालावेल, देशाच्या शत्रुला मदत करणारे मंत्रिमंडळ देशाला चालणार नाही. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. राष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यात तीव्र निदर्शने करेल असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, नगरसेवका तथा प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे उपस्थित होते.
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन