जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर हे 72000 हजार रुपयांच्या वर स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली. यामुळे ऐन लग्नसराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

जळगावात आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 73500 रुपयावर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर फेडरल बँकांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले असल्यानं सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर वाढले असल्याचं मानल जात आहे
ग्राहकांच्या मते सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याने अपेक्षित असलेली सोने खरेदी करता आली नाही,त्यामुळे कमी प्रमाणत सोने खरेदी करावी लागली असल्याचं भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे यांचे म्हणणे आहे