---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

भाजपातील एक दिग्गज राष्ट्रवादीच्या वाटेवर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । शहर मनपातील भाजपचे एक बंडखोर नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपच्या या बंडखोर नगरसेवकाचा राष्ट्रवादी प्रवेश हा विधानसभा निवडणुकीची तयारी समजला जात आहे.

rashtrwadi ncp

जळगाव शहर विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले असून अनेक जण इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत. शहर मनपात भाजपची सत्ता असताना शिवसेनेने २८ नगरसेवक गळाला लावत आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपकडून बंडखोरी करीत शिवसेनेला साथ देणाऱ्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवक हे ऐनवेळी दुसऱ्या पक्षात उड्या घेण्याची किंवा पुन्हा माघारी येण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

शहरातील माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक सुनील वामनराव खडके हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते एखाद्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नगरसेवक पद जाऊ नये यासाठी तूर्तास ते शिवसेनेचे लेबल काढून राष्ट्रवादीचे लेबल लावतील. सुनील खडके हे घड्याळ हाती न बांधता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. जळगाव लाईव्ह न्यूजला त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---