जळगाव विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे नंदू महाजन यांना उमेदवारी जाहीर

मे 31, 2026 10:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून दिल्या जाणाऱ्या जळगाव विधानपरिषदेच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. भारतीय जनता पक्षाने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे रावेर क्षेत्रप्रमुख नंदू महाजन यांना उमेदवारी जाहीर केली असून महाजन हे उद्या, सोमवार दिनांक १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

nandu mahajan

राज्यातील एकूण १७ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जळगावच्या जागेवरून महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. दोन्ही पक्षाकडून दावे केले जात होते. अखेर महायुतीमधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपकडे गेल्यानंतर, पक्षाने नंदकिशोर (नंदू) महाजन यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.

नंदकिशोर महाजन यांना रविवारी रात्रीच उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महाजन उद्या (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी महायुतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now